Vasai-Virar : 'बविआ'ने दाखवली पुन्हा ताकद! परिवहन समितीवर वर्चस्व, सर्व 12 जागांवर विजय

Transport Committee Election BVA : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडणुकीसाठी 12 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. मात्र, बविआने पुन्हा आपली ताकद दाखवून देत सर्व जागांवर विजय मिळवला.
corruption allegations in Vasai Virar Municipal Corporation
corruption allegations in Vasai Virar Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

Vasai-Virar News: वसई-विरार महापालिका निवडणुकीतील विजयानंतर बविआने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या परिवहन समिती सदस्यांची निवड आज पालिकेचा महासभेत पार पडली.

या निवडणुकीत बहुमताच्या आधारावर बहुजन विकास आघाडीने 12 जागा निवडून आणल्या आहे .या समिती मध्ये स्थायी समिती सभापती हे कायम सदस्य असतात. या बाबतची घोषणा महापौर अजीव पाटील यांनी महासभेत केली.

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्य निवडणुकीसाठी 12 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे 12 आणि भाजपचे 12 उमेदवारांचा सामावेश होता.

महासभेत बहुमताच्या जोरावर बविआचे 12 चे 12 सदस्य निवडून आले आहेत .त्यामुळे परिवहन समितीवर बविआची एकहाती सत्ता आली आहे .आता परिवहन समितीच्या सभापती पदासाठी बहुजन विकास आघाडी कोणाला पसंती देते याकडे साऱ्यांचे कक्ष लागून राहिले आहे.

परिवहन समिती सभापती पदासाठी ठाणे महापालिकाचे निवृत्त परिवहन समिती महाव्यवस्थापक अशोक रणखांब ,माजी परिवहन सभापती प्रितेश पाटील ,राजन पोतदार आणि किरण ठाकूर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. यामधून बविआ पक्षश्रेष्ठी कोणाला सभापतीपदासाठी पसंती देतात याबाबत बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

corruption allegations in Vasai Virar Municipal Corporation
BJP Political news : देशातील आणखी एक पक्ष फुटला; मित्रपक्षाचेच आठ आमदार भाजपच्या गळाला, रात्रीत फिरली चक्रं

विजयी झालेले सदस्य

1. किरण तुकाराम ठाकूर

२. जतिन बाळकृष्ण पाटील

३. प्रतीक राजेंद्र जाधव

४. नवनाथ संभाजी शिंदे

५. प्रितेश हरेश्वर पाटील

६. सागर भालचंद्र पाटील

७. राजन दिनानाथ पोतदार

८. दिव्यांक अशोक चौहान

९. रमाशंकर योगेंद्र मिश्रा

१०. अशोककुमार दत्ता रणखांब

११. नवनाथ मनसाराम पगारे

१२. मंथन महेश डगली

corruption allegations in Vasai Virar Municipal Corporation
Vidyanand Bapat: ‘डीजेविरोधी’ विद्यानंद बापट पुणे पदवीधर निवडणूक लढणार? एका पोस्टने चर्चेला उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com