Uddhav Thackeray : वसंत मोरे, चंद्रहार पाटील अन् वरूण सरदेसाई यांच्यावर ठाकरे गटात मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी मोरे, पाटील आणि सरदेसाई यांची मोठ्या पदांवर नियुक्ती केली आहे. मात्र, हे तीन चेहरे विधानसभेच्या रिंगणात दिसणार का?
uddhav thackeray | chandrahar patil | varun sardesai
uddhav thackeray | chandrahar patil | varun sardesai sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) मोठ्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात युवासेना नेते, वरूण सरदेसाई, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवसेना नेते, वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तीनही नेते विधानसभेच्या रिंगणात उतरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना ( Shivsena ) सचिवपदी संजय लाखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेनेचे चार संघटक जाहीर करण्यात आले आहेत. ललिता पाटील, वसंत मोरे, मुकेश साळुंके यांची शिवसेना संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

uddhav thackeray | chandrahar patil | varun sardesai
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचे 'परफेक्ट टायमिंग' मविआतील वादावर पडदा टाकणार

वरूण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभाप्रमुख

युवासेने नेते, वरूण सरदेसाई यांची मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरूण सरदेसाई वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. अनेक दिवसांपासून ते तेथून तयारी करताना दिसत आहेत. येथे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विद्यमान आमदार आहेत. मात्र, सिद्दीकी यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी ( अजितदादा पवार ) जवळीकता वाढली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस लढणार की शिवसेना हे आगामी काळात कळेल.

खडकवासला की हडपसर?

दुसरीकडे मनसेतून वंचित व्हाया शिवसेना, असा प्रवास करून आलेले वसंत मोरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. वसंत मोरे यांनी वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवानंतर मोरे यांनी 'मशाल' हाती घेतली. वसंत मोरे हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून विधानसभा लढविण्यास इच्छुक आहेत.

uddhav thackeray | chandrahar patil | varun sardesai
Assembly Election 2024 : ठरलं तर! शरद पवारांचे डावपेच, काँग्रेसची तरुण फळी आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा...

चंद्रहार पाटील विधानसभा लढविणार?

तर, लोकसभेतील पराभवानंतर चंद्रहार पाटील सांगली जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. शिवसेना हा पक्ष सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि मिरज या जागा लढविणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे. मात्र, चंद्रहार पाटील स्वत:हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार का? हे पाहावं लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com