Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचे 'परफेक्ट टायमिंग' मविआतील वादावर पडदा टाकणार

Political News : कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करा, माझा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे आवाहन शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पाटोले यांना करून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Uddhav Thackeray, Nana Patole, Prithviraj Chavan, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Nana Patole, Prithviraj Chavan, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करा, माझा त्याला पूर्ण पाठिंबा असेल, असे आवाहन शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पाटोले यांना करून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. महायुतीला सत्तेतून खाली खेचणे, हे महाविकास आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी याद्वारे अधोरिखित केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी योग्य वेळ साधली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यावरून अंतर्गत वादविवादही पाहायला मिळत होते. या मुद्द्यावर आपण मागे नाहीत, असे दाखवायला काँग्रेस (Congress) नेत्यांनी सुरुवात केली होती. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यासाठी यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या हाती आयते कोलित मिळाले होते. मात्र, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्याला पूर्णविराम देत राजकीय कौशल्याची झलक दाखवली आहे.

विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर लढणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार, यावर एकमत होणे कठीण असते. महाविकास आघाडीत तसेच झाले आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री हा सर्वांना मान्य होणारा राजकारणातील फॉर्म्युला आहे, मात्र त्यात एकमेकांच्या उमेदवारांची पाडापाडी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा, अशी भूमिका ठाकरे यांची आहे.

ही भूमिका घेताना त्यांनी मतभेद संपवण्याची संदेशही दिला आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणालाही जाहीर करा, मी त्याला पाठिंबा देईन, असे ते म्हणाले आहेत. त्यांचे हे आवाहन शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी होते. महायुतीला सत्तेतून खाली खेचणे, हा महाविकास आघाडीचा प्राधान्यक्रम असला पाहिजे, हेही त्यांनी याद्वारे अधोरिखित केले.

मुंबईत महाविकास आघाडीचा शुक्रवारी मेळावा झाला. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी ओघवत्या शैलीत उपस्थितांना खिळवून ठेवणारे भाषण केले. त्यांच्या भाषणाला धार होती, त्यात महत्वाचे मुद्दे होते.

Uddhav Thackeray, Nana Patole, Prithviraj Chavan, Sharad Pawar
Modi Government : डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत मोदी सरकारचा महत्वाचा आदेश; बंगालमधील घटनेनंतर खडबडून जाग

उद्धव ठाकरे यांच्याकडे वक्तृत्वशैली नाही, असे म्हणताना यापुढे विचार करावा लागणार आहे, असेच हे भाषण होते. काहीही झाले तरी महाविकास आघाडीला बांधून ठेवायला हवे, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका या भाषणातून समोर आली. महाविकास आघाडीत सुरू असलेली धुसफूस त्यांमुळे बंद होण्याची शक्यता आहे.

ज्यांचे आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री राहील, अशी भूमिका महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असले पाहिजेत, असे शिवसेनेला वाटते. याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून फारसा आक्षेप घेण्यात आलेला नाही, मात्र काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. त्यामुळे नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. लोकसभेची परिस्थिती वेगळी होती. शिवाय उद्धव ठाकरे, शरद पवार यांना असलेल्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेसलाही झाला होता. शिवसेनेकडे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरद पवार आहेत. काँग्रेसकडे असे राज्यव्यापी नेतृत्व नाही.

Uddhav Thackeray, Nana Patole, Prithviraj Chavan, Sharad Pawar
Nana Patole Attack On BJP : दिल्ली सरकारमधील ‘हम दो, हमारे दो’ नेत्यांचे महाराष्ट्र हे एटीएम; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात सख्य असल्याचे चित्र दिसत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार फुटले होते. 2022 च्या राज्यसभा निवडणुकीतही असा प्रकार घडला होता.

नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात या पहिल्या फळीतील नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतात. या पहिल्या फळीतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील यशासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेसमधील सतेज पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, अमित देशमुख या तरुण नेत्यांचे आभार मानले पाहिजेत.

Uddhav Thackeray, Nana Patole, Prithviraj Chavan, Sharad Pawar
Sharad Pawar : राहुल गांधीच्या जागेवरून शरद पवार बोलले, 'धोका टळला नाही...'

आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली आहे. कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणे हे या दोन्ही पक्षांना शक्य होणार नाही.

शरद पवार यांचा चेहरा आहे, मात्र ते या पदासाठी निश्चितपणे इच्छुक नसणार. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे एक नाव जाहीर केले तर अन्य नेते आणि त्यांचे गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढे करण्यावाचून महाविकास आघाडीकडे पर्याय नाही. त्यांनी आज ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, ते पाहता त्यांचेच नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Uddhav Thackeray, Nana Patole, Prithviraj Chavan, Sharad Pawar
Uddha Thackeray : मोदींना आव्हान, फडणवीसांना इशारा अन् शिवसैनिकांना आदेश; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com