Vidhan Bhavan Hassle: विधिमंडळाच्या लॉबीतील हाणामारी! आव्हाड प्रचंड संतापले, पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; नेमकं काय म्हणालेत दोघेही?

Vidhan Bhavan Hassle: विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आजवर जे घडलं नव्हतं ते घडलं! आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.
Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Published on
Updated on

Vidhan Bhavan Hassle: विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आजवर जे घडलं नव्हतं ते घडलंच! आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या गुंड कार्यकर्त्यांकडून जनतेचं व्यासपीठ असलेल्या या विधानभवनाचं पावित्र भंग केलं. या घटनेचे तीव्र पडसाद नंतर उमटले. जितेंद्र आव्हाडांनी या घटनेवर व्यक्त होताना प्रचंड संताप व्यक्त केला. तर दुसरीकडं पडळकरांनी मात्र आपल्याला काहीच माहिती नाही, अशा अविर्भावात यावर भाष्य करणं टाळलं. पत्रकार त्यांना वारंवार विचारत होते की नेमकं काय घडलंय? पण आपल्याला काहीही माहिती नाही, असं सांगत त्यांनी काढता पाय घेतला. पण नतंर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Vidhan Bhavan : विधानभवनाचं पावित्र्य भंग! लॉबीमध्ये पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांचे कपडेही फाडले

...तर आमदार राहायचं कशाला? - आव्हाड

या घटनेवर विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना आव्हाड प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, "पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. जर तुम्ही गुडांना विधानभवनात प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करणार असतील तर मग आमचेच जीव सुरक्षित नाहीत. मी स्वतः याबाबत ट्विट टाकलं आहे, मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या आहेत. तुला मारुन टाकू, कुत्रा, डुक्कर अजून काय काय लिहिलंय धमकी देणाऱ्यांनी. काय चालूए काय विधानसभेत? मी भाषण करुन बाहेर आले आणि थोडी मोकळी हवा घ्यायला बाहेर गेलो होते तर हे मलाच मारायला आले होते हे सगळे. विधानसभेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भवनात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवालयासाऱखा येतो आणि आमच्या आई-बहिणीवरुन शिव्या देतो. त्याला अधिकृत संसदीय शब्द म्हणून जाहीर करा, सत्तेचा एवढा माज"

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Vidhan Bhavan : विधानभवनाचं पावित्र्य भंग! लॉबीमध्ये पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांचे कपडेही फाडले

तर या घटनेनंतर पुन्हा सभागृहात गेल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर आपली भूमिका मांडली. आव्हाड म्हणाले, मला त्या एसएमएसवरती अत्यंत गलिच्छ शब्दांत शिव्या देण्यात आल्या आहेत. मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. हे गुंड माझ्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. हे काय सुरु आहे? तुम्ही व्हिडिओ देखील तपासा त्यात तुम्हाला लगेच कळेल की हल्ले कसे केले जात आहेत. मला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे, मी तुमच्या नावानं ट्विट केलेलं आहे.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Assembly Session : 1 कोटी 65 लाखांचं एक शौचालय, सगळ्यांचे डोक्यावर हात : उदय सामंतांना आठवला आर.आर. आबांच्या भाषणातील किस्सा

विधानसभा अध्यक्षांचं उत्तर

जितेंद्र आव्हाडाच्या या भूमिकेवर अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, या घटनेचा संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित करवाई करेन. या सभागृहातील आणि विधीमंडळातील सदस्यांच्या सुरक्षेततेची आणि या परिसरातील जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कार्यवाही मी करेन.

Jitendra Awhad_Gopichand Padalkar
Political ruckus Vidhan Bhavan: विधानभवन परिसरात राडा; आव्हाड, जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; म्हणाले...

पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी

तर दुसरीकडं सत्ताधारी पक्षाचे अर्थात भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनाही या हाणामारीबाबत प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी घेरलं आणि नेमकं काय घडलं? हा प्रश्न विचारला. पण यावर उत्तर देणं पडळकरांनी टाळलं. त्यांनी म्हटलं की, मला काहीच माहिती नाही. पण थोड्यावेळानं त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि पुन्हा विधानभवन परिसरात दाखल झाले. यावेळी माध्यमांसमोर बोलताना म्हटलं की, विधानसभेच्या प्रांगणात जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्देवी घटना आहे. याचं आतिव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. हे आवार पूर्णपणे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती यांच्या अंतर्गत असल्यामुळं त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. तसंच याविषयी आमचे नेते मंडळींशी चर्चा करुन मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. इतकंच बोलून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com