Vijay Wadettiwar News : 'बोरवणकरांचे आरोप गंभीर, विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी'; वडेट्टीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Meera Borwankar Allegations On Ajit Pawar : पुण्यातील येरवड्यात्या भूखंड प्रकरणावरून विरोधी पक्षांकडून आता अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे.
Vijay Wadettiwar and Ajit Pawar
Vijay Wadettiwar and Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Meera Borwankar Book Controversy : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या गृहखात्याच्या भूखंडावरून अजित पवारांवर आरोप केले होते. 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात बोरवणकर यांनी सर्व प्रकरण लिहिलं आहे. याशिवाय मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. विरोधी पक्षांनी हे प्रकरण उचललं आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Vijay Wadettiwar and Ajit Pawar
Prithviraj Chavan News : आधी बोरवणकरांच्या आरोपांची 'फायरिंग'; आता तत्कालीन CM पृथ्वीराज चव्हाणांचा 'बॉम्ब'

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे. या ट्विटवरून वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून, चौकशीची मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले वडेट्टीवार?

'माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी श्रीमती मीरा बोरवणकर यांनी "मॅडम कमिशनर" या आत्मचरित्रात सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबतचे वृत्त सातत्याने माध्यमातून येत आहे.

पुण्याबरोबरच अन्य ठिकाणच्या जमिनीसंदर्भात, बदलीसंदर्भातही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर या माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केलेल्या सर्व आरोपांची शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सरकारने विद्यमान न्यायमूर्तींमार्फत तातडीने चौकशी करावी, या आरोपांमधील सत्यता जनतेसमोर आणावी, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आशा करतो की मा. मुख्यमंत्री सदर आरोपांची गंभीर दखल घेतील आणि ही मागणी मान्य करतील, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

याच प्रकरणावरून महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून अजित पवारांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि अजित पावर यांचा फोटो ट्विट करत कॅप्शन द्या असं म्हटलं आहे. आणि बक्षीस म्हणून महाराष्ट्रात वाटेल ती जमीन लिलाव करून मिळेल, असे म्हणत अजित पवार यांना टोला लगावला आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मीरा बोरवणकरांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Vijay Wadettiwar and Ajit Pawar
Meera Borwankar News : 'अजितदादांचं नाव पुस्तकात कुठेच नाही, पण...'; बोरवणकरांनी सगळं सांगितलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.