Uddhav Thackeray News : मुंबईत मतांचं राजकारण; पंतप्रधान मोदींनंतर उद्धव ठाकरेही बोहरा धर्मगुरूंच्या भेटीला!

Uddhav Thackeray News : मुंबईच्या मतांच्या राजकारणाला उधाण....
Uddhav Thackeray News :
Uddhav Thackeray News : Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) नुकताच महाराष्ट्र दौरा पार पडला. या दौऱ्यामध्ये मोदींना मुंबई शहरातील अनेक कामांचं लोकार्पण केलं. यात विशेष बाब म्हणजे मोदींनी मुस्लिम धर्मीय बोहरा समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मोदींनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख त्यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली. यामुळे मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मतांच्या राजकारणाला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

Uddhav Thackeray News :
Supreme Court Hearing : सिब्बलांकडून कायद्याचा किस; सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे : उद्या शिंदेगटाचा युक्तीवाद

उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब मुस्लिम धर्मीय बोहरा समाज धर्मगुरूंची भेट घेतली. मुंबई हे मेट्रोपॉलिटीन शहर आहे. इथे विविध जाती धर्माची, प्रांताची लोकसंख्या सामावलेली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीचा विचार करता, मोदी व ठाकरे यांच्या या भेटींना राजकीय महत्त्व आहे. याआधी मोदींनी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात संबोधित केलं होतं.

मोदी म्हणाले होते की, "माझं भाग्य असे आहे की,मी चार पिढ्यांपासून या समाजाशी जोडलेला आहे. काळ आणि विकासाच्या बदलाच्या निकषांवर बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे."

Uddhav Thackeray News :
Prashant Bamb News : गंगापूर कारखाना गेला, आता विधानसभेला करेक्ट कार्यक्रम ?

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील धर्मगुरूंची आज भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सकाळपर्यंत या भेटीबाबत कुठलीही माहिती नव्हती. मात्र अचानक ठाकरे कुटुंबाने आज बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com