Mumbai : दिल्ली, महाराष्ट्र आणि मुंबईत एकच सरकार हवं; मोदींनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग

Narendra Modi : मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. हे काम शिंदे-फडणवीसांच्या माध्यमातून होत आहे.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama

Narendra Modi : ''दिल्ली, महाराष्ट्र आणि मुंबईत एकच सरकार हवं'', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले ''मुंबईत विकास कामे जलद गतीने करण्यासाठी भाजप आणि एनडीएच्या सरकारला पाठिंबा द्या. मुंबईत 2014 पासून विकासकामांना गती मिळाली. मात्र, मधल्या काही काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे'', असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुकही केले.

Narendra Modi
Chandrakant Khaire : मोदींची हवा आता संपली, भाजप मुंबई कधीच जिंकू शकत नाही..

''डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. देशातील अनेकांची अर्थव्यवस्था ढासळत आहे. पण आपल्या देशात पायाभूत सुविधांवर अनेक कामे सुरु आहेत. विकसित भारताच्या निर्माणासाठी आपली शहरांची महत्वाची भूमिका आहे. येत्या 25 वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना देणार आहेत. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. हे काम शिंदे-फडणवीसांच्या माध्यमातून होत आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच मुंबईत कामांना वेग आला आहे'', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली ते मराठीतून बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Narendra Modi
Eknath Shinde : "मोदींच्या हस्ते कामांचं उद्धाटन होऊ नये, असं काहींना वाटतं पण नियतीपुढे..." शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!

मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले, ''जगभर भारतासंदर्भात सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील यातून फायदा होत होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जो दावोसचा अनुभव सांगितला तोच अनुभव जगभरात सगळीकडे येत आहे.''

''जगभरात सर्वांना वाटतं भारत चांगल्या प्रकारचे काम करत आहे. भारताबाबत जगभरात पॉझिटिव्हिटी वाढत आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. मात्र, भारत आता देखील ८० कोटी लोकांना मोफत राशन देण्याचे काम करत आहे'', असं मोदी म्हणाले.

Narendra Modi
Eknath Shinde : कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत मोदींचे भक्त? शिंदेनी सांगितला भन्नाट किस्सा!

''महाराष्ट्रात (Maharashtra) मध्यंतरी काळात विकासाचा वेद मंदवला होता. पण सध्या शिंदे-फडणवीस यांच्या डबल इंजीन सरकारच्या माध्यमातून मुंबईला भविष्यासाठी बनवण्याचे काम सुरू आहे. या डबल इंजिन सरकारमुळे मुंबई (Mumbai ) आणि महाराष्ट्राचा विकास होत आहे. येणाऱ्या काळात मुंबईचा अजून कायापालट होणार आहे. सर्व सामान्यांना सुविधा देणारं सरकार सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व काही ट्रॅकवर येत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांना धन्यवाद देतो'', असं ते म्हणाले.

Narendra Modi
Devendra Fadnavis News: 20 वर्षे मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फक्त स्वतःची घरं भरली; फडणवीसांची ठाकरेंवर टीका

''मुंबईच्या विकासाला बजेटचे काही कमी नाहीये. पण हा पैसा योग्य ठिकाणी गेला पाहिजे. मुंबईचे नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यामुळे योग्य काम करणं गरजेजे आहे. विकासाचा पैसा योग्य ठिकाणी लागला तर फायदा होतो. शहरात व्यवस्थित प्रशासन असेल तर पैसा योग्य ठिकाणी लागतो. मुंबई (Mumbai) ही विकासापासून कधीही दूर राहणार नाही. कारण भाजप (BJP) कधीही विकासामध्ये राजकारण आणत नाही'', असं मोदी यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com