आम्ही संकटात होतो, एकनाथ शिंदेच धावून आले : खासदार गवळींची भावना!

Bhavana Gawali : आम्हा सगळ्यांचा मातोश्रीवरून आपमान होत होता. यामुळे आम्ही उठाव केला."
Mp Bhavana Gawali
Mp Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतल्या फुटीनंतर आज मुंबईत दोन दसरा मेळावे पार प़डत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून बीकेसी मैदानात मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानातही लगबग सुरू आहे. मुंबईत आज जोरदार शक्तीप्रदर्शन दिसत आहे. राज्यभरातू दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत पोहचले आहेत. आता शिंदेच्या मेळाव्यात खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. गवळी म्हणाल्या की, "आम्ही संकटात असताना तेव्हा कोणी मदतीला आले नाही. तेव्हा फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला आले. बंगल्यात बसून नेतृत्व करता येत नाही. त्यासाठी लोकांमध्ये मिसळावे लागते. पुढे त्या म्हणाल्या, शिंदे यांना बाळासाहेबांचे आशिर्वाद स्वराज्य निर्माण करण्यासाठी मिळाले आहे. आम्हा सगळ्यांचा मातोश्रीवरून आपमान होत होता. यामुळे आम्ही उठाव केला."

Mp Bhavana Gawali
बीकेसीवर येऊन उद्धव ठाकरेंनी एकदा गर्दी पाहावी : शहाजीबापूंचे आव्हान

अवघ्या काही तासातच मुंबईत शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यांमधून मोठे राजकीय भूकंप आणि उलथापालत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी आज शिंदे मेळाव्यात उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आणि दोन खासदार प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, राज्यातील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले, मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचे तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी… आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा,'' टीझर शेअर केला आहे. चलो बीकेसी हा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com