वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ : उद्योगमंत्री सामंतांचा विश्वास

Uday Samanat : मागील सरकारने वेदांताला प्रतिसाद दिले नव्हते, शिंदे सरकारवर खापर फोडणे चुकीचे, असेही उदय सामंत म्हणाले.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विरोधकांकडून या मुद्द्यावर दबाव वाढल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवरच आरोप केले आहेत. अडीच वर्षात महाविकास आघाडीने कंपनीला योग्य प्रतिसाद दिला नाही, म्हणून हा प्रकल्प गुजरात गेला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आता महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही यावर प्रतिक्रीया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही, असं त्याचवेळचे तत्कालिन औद्योगिक मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. कंपनीकडून मागील सरकारमध्येच काय काय देण्यात येईल, याची माहिती घेतली होती. मात्र मागील सरकारडून वेदांताला कोणत्याही प्रकारे सकारात्मक प्रतिसाद देण्यात आले नव्हते, मात्र आता शिंदे सरकारवर यासाठी टीका केली जात आहे. मविआच्या हातात या कंपनीचा निर्णय घ्यायचा होता. आता शिंदे सरकारवर जे खापर फोडण्यात येते आहे, ते चुकीचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला असला तरी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे.

Uday Samant
दानवे म्हणातात, महाविकास आघाडी सरकारमुळेच 'वेदांता' प्रकल्प गुजरातला गेला...

'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे 60 : 40 असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातला जाण्याच्या वाटेवर असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणुक राज्यात होणार होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com