Pankaja Munde News : भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या आपल्या पक्षातच नाराज असल्याच्या चर्चा वारंवार होत असतात. भाजपमधीलच काही नेते पंकजा मुंडे यांना पक्षातच डावलतात, असा संताप मुंडे समर्थक सातत्याने व्यक्त करतात. मात्र यावर अनेकदा स्वत: पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. आपण पक्षात नाराज नाही, असे त्यांनी खूप वेळा स्पष्टीकरण दिले. मात्र तरीही त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसूने येते.
नुकतेच पंकजा मुंडे यांनी 'आपण कुणासमोरही झुकणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा होत होत्या. यावरूनच आता दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी राहिलेले व आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये डावललं जातं असल्याबाबत मोठे विधान केले आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या हयातीत भाजपने प्रचंड त्रास दिला होता. हेच आता त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्यासोबत घडत आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी खडसेंनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतचा एका घटनेबद्दल ही यावेळी भाष्य केले.
खडसे म्हणाले, “भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असताना, त्यांना भाजपाकडून प्रचंड त्रास दिला गेला, हे मला माहीती आहे. भाजपचं सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. हे मला माहिती आहे, कारण- मीच त्यांच्यासोबत त्यावेळी उपस्थित होतो. "
"मध्यंतरीच्या काळात त्यांची इतकी जास्त छळवणूक झाली की, त्यांच्या मनात भाजप सोडण्याचा विचार येत होता. त्यांनी पक्ष सोडून द्यावा, अशी स्थिती निर्माण केली गेली होती. आता तोच प्रकार पंकजा मुंडेंबरोबर सुरू आहे," असे ही एकनाथ खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.