Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ? काँग्रेसचा 'हा' बडा नेता म्हणाला...

Mahavikas Aghadi seat allotment : भाजपविरोधात लढणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ही लढाई लढण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे केले स्पष्ट...
Published on

Mahavikas Aghadi News : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी देशातील भाजपविरोधी पक्ष आता एकवटले आहेत. तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला महाराष्ट्रात आव्हान देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत.

यातून भाजपला आव्हान देण्याची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र जागावाटपावरून मविआमधील घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. याबाबत नाना पटोले म्हणाले की, जागावाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, मेरिटनुसारच जागावाटप होणार आहे.

Mahavikas Aghadi
Ram Mandir Opening : "22 जानेवारीला सुटी जाहीर करा" शिंदे गटाच्या नेत्यानंतर आता भाजप आमदाराचंही मुख्यमंत्र्यांना पत्र

तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच काँग्रेस (Congress), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्य आहे. भाजप (BJP) विरोधात लढणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन ही लढाई लढू ही काँग्रेसची भूमिका आहे, असे स्पष्ट करीत उलट महायुतीतच जागावाटपावरून तीव्र मतभेद आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत भयानक तणाव आहे; परंतु भाजप शेवटी ईडी, सीबीआयचा वापर करून त्यांना शांत करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. दरम्यान, अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात असताना हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य यांनीच अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू नये, असे म्हटले आहे.

अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणे चुकीचे असून ते पाप ठरेल, असे शंकराचार्य म्हणत आहेत. भाजप स्टंट करीत आहे का हे माहीत नाही, पण हिंदू धर्म भ्रष्ट करू नये, अशीच बहुसंख्य हिंदूंची भावना असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.

Mahavikas Aghadi
Buldhana : बोरी अडगावचे शेतकरी उतरले रस्त्यावर; सरकारच्या विरोधात संतापाचे कारण..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com