NCP Political Crisis: फूट राष्ट्रवादीत पण आव्हान विधिमंडळासमोर; खरा पक्ष कोणता?

NCP Crisis News: पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीत व्हीपवरून वाद होण्याची शक्यता
 Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय़ घेतला. अजित पवारांसह नऊ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे केली.

राष्ट्रवादीच्या या नऊ मंत्र्यांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यावा, तसेच या नऊ मंत्र्यांना तूर्त निलंबित करावे, अशी मागणी जयंत पाटलांनी केली. मात्र, तूर्त निलंबनाची तरतूद नसल्याने त्यांची ही मागणी फेटाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबरोबरच आता पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीत व्हीपवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 Sharad Pawar and Ajit Pawar
Ravi Rana Vs Uddhav Thackeray : अमरावतीत राजकारण तापलं; आमदार राणांची ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली; '' नामर्द मुख्यमंत्री...''

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या तोंडावरच शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कुणाची? हे ठरवण्यासंदर्भातील पेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर असणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सभागृहातील आसन व्यवस्थेबाबतचाही प्रश्न आहे.

 Sharad Pawar and Ajit Pawar
Pradeep Kurulkar-Pakistani Hasina: आरोपपत्रातील 'ती' खास गोष्ट: पाकिस्तानी हसीनाला प्रदीप कुरुलकर म्हणायचे...

तसेच शिवसेनेच्या आमदारांसंदर्भात कारवाईचे प्रकरणही विधानसभा अध्यक्षांकडे आहे. याबाबत नार्वेकरांनी शिवसेनेच्या १६ आमदारांसह ४० आमदारांना नोटीस पाठवलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण पेंडिंग असतानाच आता पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुद्दाही विधानसभा अध्यक्षांसमोर असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com