

Mumbai Political News: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांनी जामिनासाठी अर्ज केला असला तरी त्यांच्याविरोधात त्यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. देशाच्या सुरक्षेशी संबंधित घटना असताना, कुरूलकरांविरोधात इतक्या गोष्टी समोर सरकार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नाही, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
‘‘ प्रदीप कुरुलकर यांचे कारनामे समोर आल्यानंतर दहशतावाद विरोधी पथकाने त्यांना अटक केली. हनीट्रॅपमध्ये अडकून देशाच्या संरक्षणाशी संबंधित क्षेपणास्त्रांची माहितीही त्यांने संबंधित महिलेला दिली, परदेशात जाऊन ते त्या महिलेला भेटलेही. इतकेच नव्हे तर सोशल मडियाच्या माध्यमातूनही ते संबंधित महिलेशी संपर्कात होते, त्यांनी ब्राम्होस आणि अग्नी यांसारख्या क्षेपणास्त्रांचीही माहिती तिच्याशी शेअर केल्याचा संशय आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तपासात समोर आले असतानाही त्यांच्यावर केवळ ऑफिशिअल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्यापही राष्ट्रीय तपास यंत्रणे (NIA)कडे त्यांच्याशी संबंधित तपास सोपवला गेला नाही. कुरूलकर एका सामाजिक संस्थेशी संबंधित होते,’’ याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रहाची मागणीही चव्हाण यांनी या वेळी केली. कुरूलकरांवर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा, आणि त्याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला का चालला नाही, याचीही तपासणी केली जावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
पण, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सभागृहात त्यावर चर्चा करणे योग्य नाही, असे सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पृथ्वीराज चव्हाणांची मागणी फेटाळूल लावली. त्याचबरोबर कुरूलकरांविरोधात चार्जशीट दाखल झाल्यानंतर न्यायालय गुन्ह्याची व्याप्ती पाहून कलमे लावण्याबाबत निर्देश देईलच, असेही नार्वेकरांनी नमुद केलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.