Kishori Pednekar News : किशोरी पेडणेकरांना अटक होणार ?

Covid Scam : बॉडी बॅग खरेदीत ५० लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
Kishori Pedanekar
Kishori PedanekarSarkarnama

Mumbai : ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना काळातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी पेडणेकरांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गेल्यावेळी न्यायालयाने पेडणेकरांना ८ ऑगस्टपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. पण यावेळी न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे.

कोरोना काळात वैद्यकीय साहित्यासह बॉडी बॅग खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. गुरुवारी (२४ ऑगस्ट) झालेल्या सुनावणीत कोर्टाने 29 सप्टेंबरपर्यंत पेडणेकरांना दिलासा दिला होता. पण आज न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

Kishori Pedanekar
Interim Relief To Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांना मुंबई सत्र न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा..

कोरोना काळात वाढीव दराने वैद्यकीय साहित्य खरेदी केल्याने या गैरव्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्यासह एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने विरोधी पक्षनेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. पण आपण माजी परिचारिका असल्याने कोरोना काळात रुग्णालयातून निकृष्ट दर्जाच्या बॉडी बॅगच्या तक्रारी आपल्यापर्यंत आल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com