एक देवेंद्र फडणवीस हे 35 मतांच्या इतके किंमतवान ; प्रसाद लाड

Prasad Las News| या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी थेट लढत असली तरी प्रामुख्याने प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
Prasad Lad News in Marathi, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 News Updates
Prasad Lad News in Marathi, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 News Updates
Published on
Updated on

मुंबई : 'देवेंद्र फडणवीसांनी जी साथ दिली ते त्यांचा आशिर्वाद माझ्या बरोबर आहे. माझा विजय निश्चित आहे. एका देवेंद्र फडणवीसांना ३५ मतांच्या इतकी किंमत आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत राज्यातल्या अपक्षांनी न झालेल्या कामांसाठी आणि न भेटलेल्या मुख्यमंत्र्याच्या चुकील माफी नाही असे ठरवले आहे, मुख्यमंत्री भेटत नाहीत, आमदारांच्या मतदार संघातील कामे होत नाहीत, हा रोष जनतेच्या मनात आहे आणि त्याच्या फायदा निश्चितपणे भाजपला होणार आहे, आणि माझा विजय निश्चित आहे. असा विश्वास भाजप (BJP) उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis News)

तर भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. कोणीही दगाफटका करण्याची शक्यताही नाही, त्यामुळे भाजपचे पाचही उमेदवार निवडणूक येतील, यात आम्हाला तीळमात्र शंका नाही. बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर मुंबईत दाखल झाले आहे. त्यांचे पाठबळ नक्कीच आम्हाला मिळेल. राज्यसभा निवडणूकीत ज्या चुका झाल्या त्या महत्त्वाच्या नाही. पण गेल्या दुरुस्त अडीच वर्षात ज्या चुका झाल्या, आणि राज्यातील नागरिकांना देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर जो विश्वास आहे तो या निवडणूकीच्या माध्यमातून दिसून येईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. (Vidhan Parishad Election 2022 News Updates)

Prasad Lad News in Marathi, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 News Updates
आमदारांच्या मनात काय आहे ते लवकरच दिसेल : श्रीकांत भारतीय यांचे सूचक विधान

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरूध्द भाजप अशी थेट लढत असली तरी प्रामुख्याने प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकाल लागणार का, याबाबत तर्कवितर्क काढले जात आहे.

विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. तर राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडीही चांगलीच सावध झाली आहे. भाजपनेही या निवडणुकीत चमत्कार दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com