Rahul Shewale : शेवाळेंविरोधात तक्रार घेण्यास पोलिसांवर राजकीय दबाव ? ; महिला आयोग आक्रमक

Rahul Shewale : तीन महिने उलटले आहेत, मात्र पोलिसांनी यााबाबत कुठलीच कारवाई केलेली नाही. यामुळे तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगात जाऊन याबाबत आपली व्यथा मांडली.
Rahul Shewale
Rahul ShewaleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच बंडखोर खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांच्या विरोधात एका महिलेने एप्रिल महिन्यात साकीनाका पोलिसात तक्रार दिली होती. मात्र त्यावर अद्याप कुठलीच कारवाई न झाल्याने त्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाने साकीनाका पोलिसांना दिले आहेत. (Rahul Shewale latest news)

साकीनाका पोलिस राजकीय दबाबामुळे तक्रार घेत नसल्याचा आरोप महिला आयोगाने केला आहे. तक्रार दाखल करण्याचे पत्र महिला आयोगाने पोलिसांना दिले होते. राहुल शेवाळे यांच्या विरोधात त्यांच्या ओळखीच्या एका महिलेने एप्रिल महिन्यात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

तक्रार करुन तीन महिने उलटले आहेत, मात्र पोलिसांनी यााबाबत कुठलीच कारवाई केलेली नाही. यामुळे तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगात जाऊन याबाबत आपली व्यथा मांडली. त्या महिलेने आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.

आयोगाच्या वतीने मंगळवारी साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयास बोलावून एप्रिलमध्ये महिला तक्रार दाखल करते आणि त्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नाही याबाबत खेद व्यक्त करण्यात आला. पीडित महिलेच्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

Rahul Shewale
NCP : जयंत पाटलांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची कोंडी ; आघाडी संपुष्टात येणार

शिवसेनेचे खासदार शेवाळे यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचा आरोप केला होता. या महिलेनं शेवाळेंवर बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणातून शेवाळे यांना दिलासा मिळाला आहे. या महिलेविरोधातच साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणीवसूल करण्याच्या इराद्याने या महिलेने आरोप केल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. दरम्यान, शेवाळे यांच्याविरुद्ध एका युवतीने दाखल केलेल्या तक्रारीबाबत साकीनाका पोलीस ठाणे , मुंबई यांच्याकडून कारवाई होत नसल्यामुळे या युवतीने राज्य महिला आयोगाकडे (State Womens Commission) दाद मागितली होती. त्याबाबत आज राज्य महिला आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयात काल बैठक घेण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com