
Mumbai News : मणिपूरातील महिला अत्याचाराच्या वणव्याची धग महाराष्ट्र विधिमंडळातही पोहचली अन् या घटनेवरून संतापलेल्या काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री वर्षा गायकवाड, (Varsha Gaikwad) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि आमदार प्रणिती शिंदेंनी (Praniti Shinde) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाहांवर (Amit Shah) हल्लाबोल केला.
'या मोदी-शहांनी कुठे नेऊन ठेवला मणिपूर?' असा सवाल करीत, घटनेला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा ठपकाही या तिन्ही नेत्यांनी ठेवला. विशेष म्हणजे, घटनेविरोधात आंदोलन केलेल्या गायकवाड, ठाकूर आणप प्रणिती शिंदे खूपच चिडल्याचेही पाहायला मिळाले. (Latest Political Marathi News)
विधानसभेच्या आवारात माध्यमांशी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, "मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने त्या महिलांवर सामूहिक बलात्कार झाला. त्यांच्या भावाच्या आणि वडिलांची हत्या केली गेली. अशा घटना आपल्या देशात घडत असतील तर ही आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. भारतीय म्हणून आपल्यासाठी लाज आणणारी आहे. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांची महिलांच्या विरोधातली विचारसरणीमुळे आपला देश मागे जात आहे. हा फक्त मणिपूरचा विषय नाही, तर हा जगात भारत देशाचा प्रतिमेचा विषय आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, या बाबतीत दाखल केलेल्या एफआय आरमध्ये चार महिलांचा उल्लेख आहे. दोन महिन्यानंतर काल एफआयआर झाली. यामुळे या देशात लोकशाही आहे का? महिलांचा आवाज ऐकला जातो का? कोणा आवाज उठवला तर त्यांचा आवाज कसा दाबला जातो, ते आपण पाहतोय.
मणिपूरच्या मुद्द्यावर पावसाळी अधिवेशनात चर्चा व्हावी, विरोधी पक्षातील महिला आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे परवानगी मागितली होती. मात्र इतक्या संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी अध्यक्षांनी परवानगी नाकारली असल्याचा दावा विरोधी पक्षातील महिला आमदारांनी केली आहे. यामुळे महिला आमदार अधिक आक्रमक झालेल्या दिसून आल्या. (Yashomati Thakur, Varsha Gaikwad, Praniti Shinde got angry On Manipur Video viral news)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.