मलिकांच्या आरोपांवर यास्मिन वानखेडे भडकल्या, म्हणाल्या...

वानखेडेंचे शूज दोन-दोन लाखांचे, 50 हजारांहून अधिक किमतीचे शर्ट, वापरतात, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
Nawab Malik -Yasmeen Wankhede
Nawab Malik -Yasmeen Wankhede
Published on
Updated on

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईल पुढे आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. प्रभाकर साईलच्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हेदेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. आतापर्यंत वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर बोलणारे मलिक आता वानखेडे यांच्या शर्ट, पँटवरही बोलू लागले आहे.

- नवाब मलिकांचे आरोप

वानखेडे यांनी कोट्यवधी रुपयांची वसूली केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महागड्या कोटची चर्चा आधी होती. पण वानखेडे हे मोदींच्या पुढचे निघाले. समीर वानखेडेंचे सर्व फोटोज पाहा. वानखेडेंचे शूज दोन-दोन लाखांचे, 50 हजारांहून अधिक किमतीचे शर्ट, वापरतात. वानखेडेंचे टी शर्ट पाहिले तर 30 हजारांपासून सुरू होतात. मनगटावरील घड्याळे रोज बदलतात, ही घड्याळेही लाखो रुपयांची आहेत. 20 लाखांपासून 1 कोटी रुपयांचे घड्याळ वानखेडे वापरतात. असा आरोप नवाब मलिक यांनी केल आहे.

जर समीर वानखेडे स्वत: ला प्रामाणिक अधिकारी असल्याचे सांगतात, तर मग एवढ्या प्रामाणिक अधिकाऱ्याकडे 5 ते 10 कोटी रुपयांची कपडे आले कुठून, प्राणामिक अधिकाऱ्यांची जीवनशैली अशी असते का, असे सवालही मलिक यांनी उपस्थित केला आहे.

Nawab Malik -Yasmeen Wankhede
७० हजाराचा शूज, १ लाखाची पॅंट, आता वानखेडेंचा ड्रेसकोडचीही चर्चा

- काय म्हणाल्या यास्मिन वानखेडे ?

नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावत यास्मिन वानखेंडे यांनी मलिकांना उत्तर दिलं आहे. ''आमच्या आईने आम्हाला महागडी घड्याळं दिली होती. तर समीर वानखेडे वर्षातून एकदाच कपडे खरेदी करतात, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे जास्मिन वानखेडे यांनी सांगितले.

तसेच, नवाब मलिकां यांच्या जावयाकडे जग्वार गाडी आहे. ती त्यांच्याकडे कशी आली. तीन-चार कोटींच्या गाड्या यांच्याकडे येतात कुठून, यांच्याकडे एवढ्या महागाच्या गाड्या खरेदी करायलाय पैसा येतो कुठून असे सवाल उपस्थित करत यास्मिन यांनी नवाब मलिकांवरच पलटवार केला आहे.

- समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

तर, स्वत: समीर वानखेडे यांनीदेखील नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. महागड्या कपड्यांबाबत मलिकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरही वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या महागड्या कपड्यांबाबत केवळ अफवा आहेत. त्यांना याबाबत कमी माहिती आहे. अशा गोष्टी ते शोधू शकतात, असं प्रत्युत्तर वानखेडे यांनी मलिकांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com