Rohit Pawar : रोहित पवारांनी नंदीबैलाच्या कानात विचारलं, अधिवेशनातून सामान्य लोकांना काय मिळालं? त्याने दिली 'ही' रिअॅक्शन

NCP Political News : आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल..
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यात भीमथडी यात्रेत ते सहभागी झाले असतानाच तिथे सजलेला नंदीबैल समोर आला आहे. या नंदीबैलाला आमदार रोहित पवार यांनी जो प्रश्न विचारला आहे आणि त्यावर नंदीबैलाने दिलेला प्रतिसाद, हा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रश्नोत्तरातून आमदार पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांनी नंदीबैलाला विचारले, या नागपूर हिवाळी अधिवेशनातून राज्य सरकारकडून सामान्य लोकांना काय मिळालं ते सांगा? यावर नंदीबैलाने नकारार्थी मान हलवली. नंदीबैलाचा सांभाळ करणारा नाही जी रं... नाही म्हणतो, नाही... नाही...म्हणतो असा सूर लावला आहे. या नाही उत्तरावर तिथं आजूबाजूला असलेल्यांमध्ये हशा पिकला होता.

Rohit Pawar
EWS Reservation : उच्च न्यायालयाचा मराठा समाजाला मोठा दिलासा; 408 उमेदवारांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नंदीबैलाला केलेल्या प्रश्नावरून महायुती भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्टवादी (अजित पवार गट) राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावर्षीतील नागपूर हिवाळी अधिवेशन आमदार रोहित पवार यांच्यासाठी अनेक गोष्टींमुळे लक्षात राहण्यासारखे आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मंत्री, नेत्यांना ते अंगावर घेताना दिसत आहेत.

यातच त्यांनी अधिवेशनापूर्वी राज्यात युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. ही यात्रा अधिवेशनावर येऊन धडकली. तिथे राज्यातील बेरोजगार युवकांबरोबरच महागाई, शेतकरी, शेती उत्पादनाला भाव आदी मुद्यांवर संघर्ष केला. यात्रेत सहभागी झालेल्या युवकांवर लाठीचार्ज झाला. पोलिसांनी यात्रेमधील प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकारी यांना ताब्यात घेतले. यामुळे ही यात्रा प्रकाशझोतात आली.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची यात्रेनिमित्त अधिवेशनाबाहेर ही कामगिरी आकर्षक ठरली. परंतु आमदार पवार यांनी अधिवेशनात महायुती सरकारवर हल्लाबोल चढवला. छोट्या-मोठ्या मुद्यावरील चर्चेत ते सहभागी झाले. यात कर्जत-जामखेडमधील मंजूर एमआयडीसीचा प्रश्न गाजला. भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार पवार यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून रद्द करून घेतला. देशद्रोही नीरव मोदी याची जागा असल्याच्या हवाला दिला.

एमआयडीसी(MIDC) साठी सरसकट जागा हवी, याकडे आमदार शिंदे यांनी लक्ष वेधले आणि त्यानुसार कर्जत-जामखेडमध्ये प्रशासनाला बरोबर घेत बैठकांचा सपाटाला लावला. एमआयडीसीचा पंधरा दिवसात नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने एमआयडीसीवर राजकारण केल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar
Ajit Pawar News : भेटीगाठी कौटुंबिक, 'मॅचफिक्सिंग' नाही; अजितदादा म्हणाले स्टॅम्प पेपरवर लिहून देतो...

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session) शेवटच्या आठवड्यात आमदार रोहित पवार यांनी या अधिवेशनातून राज्यातील सर्वसामान्यांना काय मिळाले, याकडे लक्ष वेधत चौफेर टीका केली होती. राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, शक्ती कायदा, महिला पोलिसांची भरती, बेरोजगारी, नोकरभरती, शिक्षकभरती, आरोग्य विभागाचा विद्यार्थी, शेतकरी, अंगणवाडी सेविका या घटकासह विदर्भ, मराठवाड्यातील न सुटलेले प्रश्नांवर आमदार पवार यांनी फटकेबाजी केली.

काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांबरोबर संघर्ष झाला. एकंदर नागपूर हिवाळी अधिवेशनातील राज्य सरकारच्या कामगिरीवर आमदार रोहित पवार ना-खुश आहे. त्याचे प्रतिबिंब पुणे येथील भीमथडी यात्रेत नंदीबैलाला केलेल्या प्रश्नात उमटले.

(Edited By Deepak Kulkarni)

Rohit Pawar
Madhuri Dixit In Politics : पूनम महाजनांच्या मतदारसंघात माधुरी दीक्षितची बॅनरबाजी; भाजपश्रेष्ठींच्या मनात काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com