Raj Thackeray Meet Uddhav Thackeray
Raj Thackeray Meet Uddhav Thackeraysarkarnama

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या पावलावर पाऊल टाकत 'या' दोन संघटना येणार एकत्र; लवकरच घोषणा

Sambhaji Brigade: शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे चुलत बंधू एकत्र आले आहेत. त्यांच्या एकत्र येण्याचं राज्यात अनेकांनी स्वागत केलं आहे.
Published on

Sambhaji Brigade: शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे चुलत बंधू एकत्र आले आहेत. अद्याप तरी या दोघांमध्ये राजकीय युतीची घोषणा झालेली नसली तरी त्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. याच ठाकरे बंधुंच्या पावलावर पाऊल टाकत आता राज्यातील आणखी दोन बड्या सामाजिक संघटना एकत्र येणार आहेत. लवकरच याची घोषणाही केली जाणार आहे.

Raj Thackeray Meet Uddhav Thackeray
Dada Bhuse trouble ED case : वसई-विरारच्या माजी आयुक्तांवर 'ईडी'चा छापा; एकनाथ शिंदेंचा आणखी एक 'दादा' मंत्री गोत्यात, काय आहे कनेक्शन?

शिवसेना-मनसे या दोन राजकीय पक्षांबरोबच संभाजी ब्रिगेडचे दोन्ही गट आता एकत्र येणार आहेत. या दोन्ही गटांपैकी एका गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड तर दुसऱ्या गटाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे आहेत. या दोन्ही संघटनांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये काही वर्षांपूर्वी मतभेद झाल्यानं ते वेगळे झाले होते. त्यामुळं सहाजिकचं कार्यकर्ते आणि पदाधिकारी विभागले गेल्यानं संघटना स्तरावर त्यांची पिछेहाट दिसून येत होती. पण आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्यासाठी दोन्ही संभाजी ब्रिगेडचं एकत्रीकरण होणार आहे. थोड्याच दिवसात याची घोषणा केली जाणार आहे. मनोज आखरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.

Raj Thackeray Meet Uddhav Thackeray
Walmik Karad News : वाल्मिक कराडच मुख्य सुत्रधार! विशेष न्यायालयाचे निरीक्षण; दोषमुक्तीसाठी आता हायकोर्टात धाव

दरम्यान, प्रवीण गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी अक्कलकोट इथं जीवघेणा हल्ला झाला होता. भाजपशी जवळीक असलेल्या दीपक काटे या मोक्काचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीनं गायकवाड यांच्या सर्वांगावर शाई सदृश्य काळा पेंट फासून हल्ल्याचा प्रयत्न केला होता, असा दावा खुद्द प्रवीण गायकवाड यांनी केला होता. हल्लेखोर दीपक काटे हा शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. पण प्रवीण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यानंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. यानंतर योग्यवेळी या हल्ल्यामागील लोकांना तेवढ्याच तीव्रतेनं उत्तर दिलं जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.

Raj Thackeray Meet Uddhav Thackeray
Kolhapur Politics: घरवापसी केलेल्या के.पी पाटलांना महायुतीचे वावडे, पुन्हा विरोधात लढण्याची भाषा

प्रवीण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com