Nagpur MNS News: मनसे आक्रमक! NITच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला फासलं काळं

Nagpur MNS News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Nagpur MNS News
Nagpur MNS News
Published on
Updated on

Nagpur MNS News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या NIT (Nagpur Improvement Trust) च्या सुधार प्रन्यासने एका अधिकाऱ्याला गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांवार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याला काळे फासले त्याच्या विरोधात मनसेच्यावतीने दोन वर्षांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने काळे फासल्याचा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Nagpur MNS News
Mahadevi Elephant: कोल्हापुरातील महादेवी हत्तीणी प्रकरण थेट राष्ट्रपतींपर्यंत जाणार! लोकांच्या तीव्र भावना, मोहीम सुरु

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने भ्रष्ट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदनलासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे नागपूरला आले होते. देशपांडे व राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढून तत्कालीन सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही चव्हाण यांना सुधार प्रन्यासच्या पूर्व नागपूर विभागीय कार्यालयात सलग १० वर्षे सेवेत ठेवले.

Nagpur MNS News
Timeline: 'मालेगाव' प्रकरणी कोणाला कधी झाली अटक? कोर्टात काय काय घडलं?

मौजा-चिखली (देव) एनआयटी मालकीच्या भूखंडावर अनाधिकृतपणे बसलेल्या अतिक्रमणधारकांना भूखंड वाटप करण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भानखेडा परिसरातील महानगरपालिकेने केलेली रस्त्यांची कामे सुधार प्रन्यासने केली असे दर्शवून खोटी देयके कंत्राटदाराच्या माध्यमातून उचलण्यात आल्याचाही दावा मनसेच्या कार्यकर्त्यांचा आहे. मागील दहा वर्षांपासून चव्हाण यांचे अवैध धंदे सुरू आहेत. शासकीय सेवेत असताना मागील सहा ते सात वर्षांत कोट्यवधी रुपयांची चल-अचल संपत्ती गोळा केली असल्याचे चव्हाण यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे देण्यात आले होते.

Nagpur MNS News
Malegaon Blast Verdict: दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो! NIA कोर्टाची टिप्पणी अन् एटीएसला दिले RDXच्या चौकाशीबाबत 'हे' आदेश

एवढेच नव्हते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पुराव्यासह निवेदन देण्यात आले होते. मात्र कोणीच दखल घेतली नाही असे सांगून मनसेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना काळे फासले असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com