

Mira Bhayandar news: मीरा भाईंदरमधील सेवन स्क्वेअर अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट आणि कंदमुळे आणण्यास घातलेली बंदी मनसेच्या अल्टिमेटमनंतर मागे घेतली. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या इशाऱ्यानंतर शाळेने वादग्रस्त आदेश हटवला असून पालकांना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट तसेच कंदमुळांच्या भाज्या आणण्यास मनाई करण्यात आलेल्या शाळेने अखेर माघार घेत आपला 'फतवा' मागे घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अल्टिमेटम दिल्यानंतर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या शाळेने हा आदेश मागे घेतल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
मनसे आणि मराठा एकीकरण समितीनेही शाळेच्या या आदेशावर नाराजी व्यक्त करीत आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला होता.. शाळेच्या निर्णयामागील नेमका उद्देश काय, तसेच पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवरच विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांबाबत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मनसे नेते अविनाश जाधव यांनी सायंकाळपर्यंत फतवा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर काही वेळातच शाळेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून तो फतवा हटवलाय. मनसेच्या इशाऱ्यानंतर शाळा प्रशासनाने हा आदेश मागे घेतला आहे.
मीरा भाईंदर येथील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत हा प्रकाऱ घडला. ‘सेवन इलेव्हन एज्युकेशन सोसायटी’कडून ही शाळा चालवली जाते. आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही संस्थेशी संबंधित आहेत. या प्रकरणामुळे आता शाळा प्रशासन, पालक आणि विविध संघटनांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. शिक्षण विभाग याबाबत काय भूमिका घेतो, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते.
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट तसेच कंदमुळांच्या भाज्या आणण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती काल (गुरुवारी) समोर आली होती. एवढेच नाही, तर शाळेच्या कॅन्टीनमध्येही या पदार्थांवर बंदी घालण्यात आली होती.
पालकांना यासंदर्भातील नोटीस व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे देण्यात आली आहे. जैन समाजाचा आठ दिवसीय पर्युषण पर्व सुरू असल्याने शाळेकडून हे निर्देश देण्यात आल्याची चर्चाआता पालकांनी उपस्थित केला होता. मनसेने यात पुढाकार घेत शाळा प्रशासनाने हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.