Transfers of Police Officers : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील 31 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...

Director General of Police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 8 आयुक्तालयातील तब्बल 129 अधिकारी बदलले. पोलिस महासंचालक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने काल परिपत्रक काढण्यात आले.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 8 पोलिस आयुक्तालयातील तब्बल 129 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तब्बल 38 पोलिस निरीक्षकांच्या मुंबई शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नाशिक या पोलीस आयुक्तालयात बदल्या झाल्या आहेत.

पोलिस महासंचालक (Director General of Police) विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने काल परिपत्रक काढण्यात आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या पुणे आणि पिंपरी - चिंचवड येथून 31 निरीक्षकांची मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर ठाण्यातून पुणे आणि पिंपरी - चिंचवड येथे 23 निरीक्षक बदलीवर गेले आहेत.

Ajit Pawar, Eknath Shinde
Maharashtra Budget 2024 : आचारसंहितेचा 'फास', खरिपाचा 'त्रास', उन्हाळ्याच्या 'झळा', तरी दादांना महायुतीचा 'ध्यास'

राज्यातील पिंपरी - चिंचवड, पुणे (Pune) शहर, ठाणे शहर, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर शहर, अमरावती शहर, सोलापूर या पोलिस आयुक्तालयातील 129 पोलिस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये सर्वाधिक 41 पुणे शहर, त्या खालोखाल 38 ठाणे शहर, 13 पिंपरी - चिंचवड, 11 नागपूर, 11 नाशिक, 07 छत्रपती संभाजीनगर शहर, 05 अमरावती आणि 03 सोलापूर येथील पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाण्याचे पोलिस निरीक्षक गेले आणि आले...

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातून सर्वाधिक 14 निरीक्षकांची पुणे शहरात बदली झाली आहे. तर 11 निरीक्षकांची मुंबई शहर, 09 पिंपरी चिंचवड, 03 नाशिक आणि 01 निरिक्षकांची जालना येथे बदली झाली आहे. तर सर्वाधिक 21 निरीक्षकांची पुणे शहरातून आले आहेत. त्यापाठोपाठ 10 पिंपरी चिंचवड आणि 06 नाशिक येथे आले आहेत.

(Edited by Amol Sutar)

Ajit Pawar, Eknath Shinde
Kolhapur Politics : आता सुट्टी नाही; खासदार पुत्राने घेतली राजकारणात एन्ट्री!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com