Pimpari News : युतीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी दावा केलेल्या `मावळ`मध्ये अखेर शिवसेनेचे श्रीरंगअप्पा बारणे यांना गुरुवारी (ता.२८) उमेदवारी जाहीर झाली.त्यानंतर त्यांनी लगेचच साखरपेरणी सुरु केली.उमेदवारीसाठी इच्छूक,पण, ती न मिळालेल्यांच्या गाठीभेटी त्यांनी सुरु केल्या आहेत.
गतवेळी २०१९ ला लोकसभेची उमेदवारी मिळताच विजय संपादन करण्यासाठी बारणेंनी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याशी असलेले दहा वर्षाचे कट्टर वैर संपवले. त्यासाठी ते दोन पावले मागे आले. स्वत:च भाऊंच्या भेटीस गेले. परिणामी पॉवरफुल पवार कुटंबातील सदस्य (अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ) प्रतिस्पर्धी असूनही ते दोन लाखांच्या लीडने निवडून आले.
यावेळी ते खासदारकीच्या हॅटट्रिक मोडवर आहेत. त्यामुळे ती साधण्यासाठी त्यांनी तिकिट मिळताच लगेच कंबर कसली. साखरपेरणी पुन्हा सुरु केली. भाऊंचे गेल्यावर्षी ३ जानेवारीला अकाली निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी या निवडून आल्या आहेत. त्यांचे बंधू शंकर जगताप हे पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आहेत.ते ही मावळातून इच्छूक असल्याची चर्चा होती.
त्यामुळे चिंचवड या राज्यातील दोन नंबरच्या मोठ्या व मावळ लोकसभेच्या सहापैकी सर्वात जास्त मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या स्व. भाऊंच्या पिंपळेगुरव येथील स्मृतीस्थळाला शनिवारी भेट देत बारणेंनी अभिवादन करीत प्रचाराला सुरवात केली.यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक रवि नामदे होते, नंतर भाऊंच्या घरी जात अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांची सदिच्छा भेट त्यांनी घेतली.भाऊंच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मावळची जागा राष्ट्रवादीने लढवावी,यासाठी पक्षाचे मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके गेल्या चार महिन्यांपासून मोठा पाठपुरावा करीत होते.बारणेंनी तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यापूर्वी आपल्या कामाचा अहवाल मावळवासियांना द्यावा,अशी मागणी त्यांनी केली होती.तर, युतीतील भाजपनेही या जागेवर दावा करीत त्यासाठी देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांची दोनदा भेट घेतली.
माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळाभाऊ भेगडे यांना तेथे उमेदवारी द्यावी,अशी मागणी त्य़ांनी केली होती.उद्या या दोघांच्याही (शेळके,भेगडे)भेटी बारणे खासदारकीची हॅटट्रिक नोंदविण्यासाठी घेणार आहेत.पण,ती होणार का हे ४ जूनला कळणार आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.