Murlidhar Mohol: तानाजी सावंतांनी 'पॉवर' वापरली अन् बँकॉकला निघालेलं विमान हवेतूनच माघारी फिरलं, मंत्री मोहोळ ठरले 'गेमचेंजर'

Tanaji Sawant And Rushiraj Sawant Case : ऋषिराज सावंत याने सोमवारी बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 लाख रुपये खर्चून स्पेशल चार्टर्ड विमान बुक केले होते. त्यावरुन आदल्यादिवशी सावंत यांच्या घरात मोठे खटके उडाल्याची माहिती आहे. त्यानंतरही ऋषिराज त्याच्या मित्रांसोबत पुणे विमानतळावरुन बँकॉकला जाण्यासाठी विमानात बसला.
Rushiraj Sawant Murlidhar Mohol Tanaji Sawant .jpg
Rushiraj Sawant Murlidhar Mohol Tanaji Sawant .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी दुपारनंतर पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली अन् एकच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस यंत्रणेनं तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. तर दुसरीकडे तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनीही पोलिस आयुक्तालय गाठलं. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. आणि ऋषिराज सावंत यांचं विमान पुन्हा एकदा पुण्यात सुखरुप लँड झालं. त्यानंतर सावंत कुटुंबियांसह पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान,या घटनेत मंत्री तानाजी सावंतांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावत मोठा डाव टाकला अन् ऋषिराज सावंत यांचं विमान बँकॉकऐवजी परत पुण्याच्या दिशेनं वळलं. पण आता या घटनेत केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याचं समोर येत आहे.

पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याला घेऊन दोनजण पुणे विमानतळावरुन फ्लाईटने गेल्याची माहिती देणारा पुणे पोलिसांच्या फोन कंट्रोल रुमला आला. यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. यानंतर पोलिसांन केलेल्या तपासात ऋषिराजसह त्याच्या दोन मित्रांनी एक चार्टड फ्लाईट घेत फ्लाईट बँकॉकच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर फ्लाईटचं ट्रॅकिंग आणि इतर गोष्टी करुन ही फ्लाईटचा अंदाज बांधण्यात आला.

Rushiraj Sawant Murlidhar Mohol Tanaji Sawant .jpg
Ambadas Danve On Shiv Sena : शिंदे गटाने डावलले जाण्याची सवय करून घ्यावी! अंबादास दानवे यांच्याकडून जखमेवर मीठ

राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या शिवसेनेच्या तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सूत्रे फिरवल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्यांना या घटनेत महत्त्वाची मदत केंद्रीय मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची झाल्याची माहिती समोर येत आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सीएमओनं मंत्री मुरलीधर मोहोळ यांना या घटनेबाबत तातडीनं निरोप दिला. त्यानंतर मंत्री मोहोळ यांनी तत्काळ चार्टड फ्लाईटच्या पायलटशी संपर्क साधला.

तोपर्यंत हे विमान बंगालच्या उपसागरावर पोहचले होते.मंत्री मोहोळ यांनी लगेच हे विमान पुण्याच्या दिशेनं परत घेण्याचा आदेश दिला.त्यानंतर हे विमान पुण्याच्या दिशेने माघारी फिरले. पण विमानात असलेल्या ऋषिराजला या कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती. ज्यावेळी विमान लँड झालं तेव्हा ऋषिराजला मोठा धक्का बसला कारण हे विमान बँकॉक नाही तर पुण्याला लँड झाले होते.

Rushiraj Sawant Murlidhar Mohol Tanaji Sawant .jpg
Shivsena News : शिंदेच्या शिवसेनेत चाललंय काय ? संभाजीनगरमध्ये स्थानिक नेत्यांचे जमेना!

अशाप्रकारे माजी मंत्री तानाजी सावंताचा मुलगा ऋषिराज सावंत व त्याचे दोन मित्र सोमवारी (ता.10) रात्री 9.30 वाजता पुणे विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी सावंत यांच्या मुलासह त्याच्यासोबत असलेल्या दोनही जणांचा जबाब नोंदवला आहे. फ्लाईटमधील तीनही पॅसेंजर सुखरुप होते. पण ते कोणत्या कारणासाठी बँकॉकला चालले होते,त्यांनी याबाबतची कल्पना घरी का दिली नव्हती. याबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या तपासात समोर येईल.

ऋषिराज सावंत याने सोमवारी बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 लाख रुपये खर्चून स्पेशल चार्टर्ड विमान बुक केले होते.त्यावरुन आदल्यादिवशी सावंत यांच्या घरात मोठे खटके उडाल्याची माहिती आहे. त्यानंतरही ऋषिराज त्याच्या मित्रांसोबत पुणे विमानतळावरुन बँकॉकला जाण्यासाठी विमानात बसला.

Rushiraj Sawant Murlidhar Mohol Tanaji Sawant .jpg
Suresh Dhas Vs Jitendra Awhad : आमदार धस अखेर 'एक्स्पोज' झाले, जितेंद्र आव्हाडांच्या 'ट्रॅप'मध्येही अडकले!

मुलानं न ऐकल्यामुळे तानाजी सावंतांनी मग आपली राजकीय पावर वापरण्याचं ठरवलं. सर्वपक्षीय चांगले राजकीय संबंध असलेल्या सावंतांनी थेट मग मंत्री मोहोळांना फोन लावला. अन् मग ऋषिराजचं बँकॉकचं स्वप्नं अधुरं राहिलं,अशी माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com