Mumbai News, 03 Mar : दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी अपंग व्यक्तींसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळेअपंग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास तसेच स्वतःचा व्यवसाय उभारण्यास शासनाकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.
तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवाई आणि निर्णयांसाठी संपूर्ण राज्याला परिचित आहेत. दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी त्यांची निवड झाल्यापासून त्यांनी आपल्या कामाची झलक या विभागात देखील दाखवायला सुरूवात केली आहे. असाच एक मोठा निर्णय राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत त्यांनी घेतला आहे.
ज्यामध्ये अपंग व्यक्तींना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आवश्यक साधने खरेदीसाठी करण्यासाठी 15 हजारांचं आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आजपर्यंत या योजनेद्वारे अपंगांना केवळ एक हजारांचं अर्थसहाय्य मिळत होतं. या निधित जवळपास तीन दशकांनंतर वाढ करण्यात आली आहे.
या योजनेमुळे अपंग व्यक्तींना स्वावलंबी होण्यास आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत होईल, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. तर अपंग व्यक्ती शिवणकाम, मोबाईल रिपेरिंग संगणक सेवा, ब्यूटी पार्लर, इलेक्ट्रिकल आणि वाहन दुरुस्तीची कामे असे किरकोळ व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतात. मात्र आवश्यक साधनं आणि पैशांच्या अभावी त्यांना अडचणी येतात.
मात्र, आता महाराष्ट्र शासनाच्या विकसित महाराष्ट्र, 2047 कृती आराखड्यातील अपंग सक्षमीकरणविषयक रोजगार व स्वयंरोजगार या ध्येयाचा एक भाग म्हणून शासनाने ही योजना कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आता अपंग व्यक्तींना त्यांच्या आवडीचा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
ही योजना अपंगांच्या सर्व प्रवर्गांसाठी लागू असून प्रशिक्षित अपंग अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेलं असावं. या योजनेमध्ये प्रशिक्षित अपंग महिलांना प्राधान्य देण्यात आलंय. योजनेचा निधी थेट आधारसंलग्न बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
लाभार्थ्यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे. तर निधी वितरित झाल्यानंतर लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करण्यात येणार आहे. तर https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून नोंदणी करता येणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन देखील दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.