IAS officer controversy : महिला IAS अधिकाऱ्याची थेट न्यायाधीशांना फोनवर धमकी; मग कोर्टानेही दिला जोरदार झटका...

IAS Durga Shakti Nagpal, Allahabad High Court, contempt case : दुर्गा शक्ती नागपाल यांच्यावर न्यायाधीशांना धमकावल्याचा गंभीर आरोप; अलाहाबाद हायकोर्टाने न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर प्रहार मानत मानहानीची कार्यवाही सुचवली.
Durga Shakti Nagpal IAS
Durga Shakti Nagpal IASSarkarnama
Published on
Updated on

IAS officer pressure allegation : उत्तर प्रदेशातील IAS अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी थेट दिवाणी न्यायाधीशांना फोन करून धमकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारानंतर न्यायव्यवस्थाही हादरून गेली आहे. एका प्रलंबित जमीन प्रकरणाशी संबंधित खटल्याबाबत नागपाल यांनी महिला न्यायाधीशांना फोन करत त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

आयएएस नागपाल या सध्या देवीपाटन विभागाच्या आयुक्त आहेत. गोंडामध्ये ३० वर्षांपासून नझूल जमीन वादाचे प्रकरण प्रलंबित आहे. दिवाणी न्यायाधीश शबीना खान यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. नागपाल यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर बोलण्यासाठी थेट न्यायाधीशांना फोन केला होता. एवढेच नाही तर त्यांना हायकोर्टात तक्रार करण्याची धमकीही दिली होती.

न्यायाधीश शबीना खान यांनी याबाबत अलाहाबाद हायकोर्टाला लिहिलेल्या पत्रात आपबीती सांगत हे प्रकरण दुसऱ्या कोर्टात पाठविण्याची विनंती केली होती. नागपाल आणि न्यायाधीशांमध्ये १५ जुलैला संभाषण झाले होते. तक्रारीत म्हटले आहे की, फोनवर नागपाल म्हणाल्या, बरं झालं तुम्ही बोलत आहात, नाहीत तुमची हायकोर्टात तक्रार करणार होते.

Durga Shakti Nagpal IAS
PM Modi-Trump Meeting : मोदी-ट्रम्प भेटीवेळी भारताला नको होती पत्रकार परिषद, पण ट्रम्प विसरले अन्..! अमेरिकेच्या राजदुतांनी केला गौप्यस्फोट

वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याशी कसं बोलावं, एवढी समज तुमच्यात नाही का? मी माझ्या २७ वर्षांच्या सेवेत असा अधिकारी पाहिला नाही. तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही न्यायाधीश आहात की नाही, याची शंका येते, असे नागपाल फोनवर बोलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपण नागपाल यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकून घेतले नाही. उलट त्यांनी तुमचे संगोपन कसे झाले आहे?, असे म्हटल्याचे न्यायाधीशांनी तक्रारीत नमूद केले आहे.

न्यायाधीश शबीना खान यांनी हायकोर्टाला लिहिले पत्रात याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सरकारची बाजू मांडण्यासाठी कोर्टात सरकारी वकील असतात. पण त्यानंतर आयुक्तांनी एक वरिष्ठ आयएएस अधिकारी असल्याचा हवाला देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रलंबित प्रकरणाबाबत निष्पक्ष न्याय व्हावा यासाठी ही केस दुसऱ्या कोर्टाला द्यावी, अशी विनंती न्यायाधीशांनी केली आहे.

Durga Shakti Nagpal IAS
तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

IAS अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

न्यायाधीश खान यांच्या तक्रारीची अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. कोर्टाने दुर्गा शक्ती नागपाल यांच्या या कृत्याला थेटच न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर प्रहार असल्याचे म्हटले आहे. तसेच कोर्टाने हे संपूर्ण प्रकरण मानहानीच्या कार्यवाहीसाठी मुख्य न्यायमुर्तींकडे पाठविले आहे. त्यामुळे नागपाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तसेच कोर्टाने जमिनीशी संबंधित प्रकरणही अन्य कोर्टात हलविले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com