ISRO URSC Recruitment 2024 : इस्रोमध्ये नोकरीची संधी; उपग्रह केंद्रात होणार 224 जागांसाठी भरती

Job opportunities in ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने यू आर राव उपग्रह केंद्रातील विविध रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
ISRO
ISROSarkarnama

Job in ISRO : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन स्पेस रिचर्स ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो(ISRO)मध्ये काम करण्याची संधी आहे. इस्रोने विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि निकष यासह इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात..

अंतराळ संशोधन क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने यू आर राव उपग्रह केंद्रातील विविध रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार इस्रोमध्ये तब्बल 224 जागांवर नोकर भरती केली जाणार आहे. यामध्ये सायंटिस्ट/इंजिनिअर पदाच्या 05 जागा, टेक्निशियन-B पदाच्या 126 जागा, ड्राफ्ट्समन-B पदाच्या 16,टेक्निकल असिस्टंट- 55, सायंटिफिक असिस्टंट- 06, लायब्ररी असिस्टेंट - 01, कुक- 04, फायरमन- 03, हलके वाहन चालक - 06, अवजड वाहन चालक - 02 अशा एकूण 224 जागांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ISRO
Talathi Exam Fraud : तलाठी भरती परीक्षेत कॉम्प्युटर हॅक करून दिला पेपर ? धक्कादायक माहिती समोर

या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. यामध्ये शास्त्रज्ञ/अभियंता पदासाठी 60 % गुणांसह M.E/M.Tech किंवा B.E/B.Tech (Mechanical/Chemical) किंवा M.Sc (Physics/ Applied Physics/Mathematics) विषयातून उत्तीर्ण असावा. तसेच टेक्निशियन आणि ड्राफ्टसमन पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि ITI/NTC/NAC उत्तीर्ण असावे.टेक्निकल असिस्टंट पदासाठी प्रथम श्रेणीमधून इंजिनिअरिंग पूर्ण केले असावे. सायंटिफिक असिस्टंट पदासाठी B.Sc झालेला उमेदवार असावा, तर सहायक ग्रंथपाल पदासाठी उमेदवार हा पदवीधर आणि ग्रंथालय विज्ञान समतुल्य पदवी प्राप्त असावा. याशिवाय कूक, फायरमन, वाहनचालक या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असावे, परंतु कामाचा अनुभव आणि वाहन चालकांसाठी चालक परवाना असणे आवश्यक आहे.

ISRO मधील या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 01 मार्च 2024 रोजी किमान 18 वर्षे पूर्ण आहे. तसेच कमाल वयोमर्यादेमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे अधिकची सूट दिली जाणार आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट दिली जाणार आहे. या भरतीसाठी खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांकडून 750 रुपये शुल्काची आकारणी केली जाणार आहे, तर मागासवर्गीय उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाइन अर्ज दाखल करताना भरणा करायचे आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करायचा आहे. यासाठी उमेदवाराने www.isro.gov.in / www.ursc.gov.in / www.istrac.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. भरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर भेट द्या - जाहिरात लिंक - https://www.isro.gov.in/URSC-ISTRAC-RMT-2024.html

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com