नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. महावितरणकडून लेखा विभागात कनिष्ठ सहायकपदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 468 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
महावितरणच्या वतीने कनिष्ठ सहायक या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवार हा बीकॉम, बीएमएस किंवा बीबीएची पदवी प्राप्त केलेला असावा. उमेदवाराने एमएससीआयटी (MSCIT) कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्या उमेदवाराने महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website - www.mahadiscom.in) आपला अर्ज सादर करायचा आहे.
महावितरणकडून कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी निवड करताना पात्र अर्जदारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 150 गुण असून यासाठी 2 तासांचा वेळ दिला जाणार आहे. या परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन माहिती घ्यावी. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवाराने आपली माहिती पूर्णपणे भरावी, अर्धवट माहितीचे अर्ज बाद ठरवले जातील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारास वयामध्ये 05 वर्षे अधिकची सूट देण्यात आली आहे, तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तसेच या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 500/- रुपये, तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकडून 250/- रुपये भरती शुल्क आकारले जाणार आहे. उमेदवारांनी ते अर्जासोबत ऑनलाईन भरणा करायचे आहे. या भरतीबाबत अधिकच्या माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात पाहणे. भरतीची जाहिरात लिंक -https://drive.google.com/file/d/1l7m9xIS9Nw6LpNkXF1nOEi0ztzH3oyOv/view
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.