

Latur News : विदर्भ, नाशिक विभागात शिक्षक भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकारानंतर आता राज्यभरात चौकशी सुरू आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी एका समितीने लातूर येथे येऊन 20 दिवस तपासणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याने धाकधूक वाढली आहे. लातूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) दाखल झाले आहे. बुधवारी राज्याचे शिक्षण संचालक स्वतः लातूर जिल्ह्यात येणार आहेत.
त्यापूर्वी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पथकाने शिक्षण मंडळात बसून फायली तपासल्या आहेत. त्यानंतर दीड हजारहुन अधिक फायली मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा परिषद कार्यालयाकडे हलवण्यात आल्या आहेत. एसआयटी चौकशीच्या ऐन तोंडावर सुरू असलेल्या या वेगवान घडामोडीमुळे संशय व्यक्त होत आहे.
लातूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून केली जात आहे. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, बोगस शिक्षक भरती आणि बोगस शालार्थ आयडीसंदर्भात नावानिशी पुरावे दिले आहेत. त्यासोबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. आता या संस्थांची चौकशी करण्यासाठी पथक लातूरमध्ये आले आहे. त्यामुळे सर्वांचे या चौकशीकडे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात सुरू असलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) दाखल झाले आहे. हे पथक शिक्षक भरती व वैयक्तिक मान्यता प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी राज्याचे शिक्षण संचालक स्वतः जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या पथकाने शिक्षण मंडळात बसून फायली तपासल्या. त्यानंतर दीड हजारोहन अधिक फायली रात्री उशिरा जिल्हा परिषद कार्यालयाकडे हलवण्यात आल्या.
माध्यमिक शिक्षण विभागाने तब्बल 1 हजार 378 संचिका उपसंचालक कार्यालयात जमा केल्या असून, प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारीही फायलीचे वर्गीकरण करण्यात येत आहे. या चौकशीच्या धावपळीत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मात्र जागेवर नसल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी याला वार्षिक तपासणीची नियमित प्रक्रिया म्हटले असले, तरी चौकशीच्या ऐन तोंडावर सुरू सुरू असलेल्या हालचालींळे संशय व्यक्त केला जात आहे.
या दौऱ्यात शाळांची पाहणी, विद्यार्थी शिक्षक उपस्थिती, रिक्त पदे आणि निधी वापराचा आढावा घेतला जाईल. एसआयटीच्या एन्ट्रीने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले, वर्गीकरणाचे काम सुरू आहे. २०१९ पासूनच्या वैयक्तिक मान्यता, नियुक्त्यांची तपासणी करणे. शिक्षक भरतीतील पारदर्शकता व निकष याची पाहणी करण्यात येणार आहे.
लातूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील नियुक्त्यांची एसआयटी चौकशी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळात मंगळवारी संस्थाचालकांची गर्दी वाढली होती. संबंधित फायलीतील त्रुटींची कागदपत्रे जोडण्यासाठी तसेच नोंदी पूर्ण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत संस्थांचे प्रतिनिधी कार्यालयाच्या घिरट्या घालत असल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे चौकशीपूर्वीच फायली 'दुरुस्त' करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या तपासणीत शिक्षण विभागातील अनेक अनियमित बाबी समोर येण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी बहुतांश तक्रारींची चौकशी पूर्ण झाली आहे. मात्र, अनेक तक्रारींसोबत आवश्यक पुरावे जोडलेले नाहीत. त्यामुळे त्यावर कारवाई कशी करायची, हा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.