Document registration : दस्त नोंदणीसाठी आता कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही; दुय्यम निबंधक थेट तुमच्या घरी येणार!

Maharashtra Document registration department : ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना अनेकदा आपल्या दस्त नोंदणीसाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य असते. मात्र, आता अशा नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरजच भासणार नाही, असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
Home Document Registration | Maharashtra Home Visit
Maharashtra’s new home visit registration facility allows senior citizens and patients to complete document registration from their residence.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 Aug : वयोमान, आजारपण किंवा अन्य कारणांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करणे शक्य होत नसलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता अशा नागरिकांना घरबसल्या दस्त नोंदणीची सुविधा मिळणार असून, त्यासाठी ‘गृहभेट प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे.

या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. संबंधित नागरिकाला गृहभेटीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाकडून गृह भेटीसाठी दिवस किंवा वेळेचा पर्याय दिला जाणार आहे.

निश्चित केलेल्या दिवशी दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांकडून संबंधित नागरिकाच्या घरी जाऊन दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या सुविधेसाठी शासनाने पाच हजार रुपये शुल्क निश्चित केले आहे. अर्जदाराने हे शुल्क भरल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

दरम्यान, दुय्यम निबंधकांच्या दैनंदिन कामकाजामुळे गृहभेटीसाठी तत्काळ वेळ मिळेलच असे नाही. त्यामुळे अर्ज केल्यानंतर नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. गृहभेटीद्वारे वर्षभरात किती दस्त नोंदणी झाली, याची एकत्रित आकडेवारी विभागाकडे उपलब्ध होत नाही. मात्र, ही सुविधा विशेषतः ज्येष्ठ आणि आजारी नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Home Document Registration | Maharashtra Home Visit
Shalarth ID Scam : महाजनांच्या निकटवर्तीयाला 160 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटक, पण एकदाही तुरुंगात नेलं नाही, आता रुग्णालयातूनच जामीन मिळणार?

घरातूनच दस्त नोंदणी

दस्त नोंदणीसाठी कार्यालयात जाणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि तासन्‌तास प्रतीक्षा करणे यामुळे ज्येष्ठ व आजारी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गृहभेट प्रणालीमुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.

Home Document Registration | Maharashtra Home Visit
Teacher recruitment scam : बोगस शिक्षक प्रकरणात महाराष्ट्रातील 5 जिल्हे रडारवर : 6 वर्षांत रुजू झालेल्यांची होणार SIT चौकशी

‘अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यक खातरजमा केली जाते. त्यानंतर संबंधित नागरिकाच्या घरी जाऊन दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. वयोमान, आरोग्यविषयक समस्या किंवा अन्य कारणांमुळे कार्यालयात येणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक, अभयंसिंह मोहिते यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com