Social Media Rules : फडणवीस सरकारचा 'रीलस्टार' अधिकाऱ्यांना झटका; सोशल मीडियाच्या वापरासाठी कडक नियम

Social Media Rules for Government Employees : सर्व राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी, कंत्राटी व बाह्यस्रोताद्वारे नियुक्त कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे आणि महामंडळांमधील कर्मचाऱ्यांना या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
Maharashtra government social media rules for employees
Maharashtra government social media rules for employeesSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 29 Jul : राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (ता.२८ ) परिपत्रकाद्वारे दिला.

सर्व राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी, कंत्राटी व बाह्यस्रोताद्वारे नियुक्त कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे आणि महामंडळांमधील कर्मचाऱ्यांना या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. नुकतेच देशभर नीट विरोधात युवकांनी छेडलेले आंदोलन, त्याला समाज माध्यमातून मिळालेला प्रतिसाद या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाला महत्व आले आहे.

नव्या नियमांनुसार, शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य अथवा केंद्र सरकारच्या कोणत्याही चालू किंवा अलीकडील धोरणांवर, कृतींवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी किंवा टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक अथवा समाजात भेदभाव निर्माण करणारा कोणताही मजकूर शेअर, फॉरवर्ड किंवा अपलोड न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

वैयक्तिक सोशल मीडिया आणि शासकीय गणवेश

कर्मचाऱ्यांनी आपले वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया खाते पूर्णपणे स्वतंत्र ठेवावे. वैयक्तिक खात्यावर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा, लोगोचा, गणवेशाचा (वर्दी) किंवा शासकीय वाहने व इमारतींसारख्या मालमत्तेचा वापर करून रिल्स, फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Maharashtra government social media rules for employees
Pune Crime : 'सिया'च्या जाळ्यात अडकून पोलीस पाटलाची 56 लाखांची फसवणूक, व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होणं पडलं महागात

गोपनीयता आणि स्वयंप्रशंस राहिल दूर

सक्षम प्राधिकाराच्या पूर्वमंजुरीशिवाय किंवा प्राधिकृत केल्याशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे अथवा माहिती सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. तसेच, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा मजकूर पोस्ट करताना त्याद्वारे 'स्वयंप्रशंसा' होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कार्यालयीन संवादासाठी व्हॉट्सॲपला मुभा

शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सॲप, टेलिग्राम सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अधिकृत वापर करता येईल. मात्र, केंद्र अथवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या कोणत्याही वेबसाईट्स किंवा ॲप्सचा वापर कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. तसेच, कर्मचाऱ्याची बदली झाल्यास कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंटचा ताबा योग्य प्रकारे हस्तांतरित करणे अनिवार्य केले आहे.

Maharashtra government social media rules for employees
PMC Corruption : पुण्यातील भाजप आमदार अडचणीत? काँग्रेस नेत्याकडून कथित भ्रष्टाचाराचे प्रकरण थेट सरसंघचालकांच्या कानावर

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९' हे सोशल मीडिया वापरासाठीही लागू आहेत. या मार्गदर्शक सूचनांचा किंवा वर्तणूक नियमांचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर 'महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९' नुसार कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा या परिपत्रकात देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com