MAHARASHTRA IAS Officers TRANSFERS : राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे संधी? संजय खंदारे वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी

Three senior IAS officers transferred News : राज्य सरकारकडून सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामधील 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra IAS officer transfer .jpg
Maharashtra IAS officer transfer .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. सोमवारी राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संजय खंदारे यांच्याकडे वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामधील 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांसह नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 1996 च्या बॅचचे IAS अधिकारी संजय खंदारे हे पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची आता वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय यादव यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी

2009 च्या बॅचचे (IAS) अधिकारी संजय यादव हे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वैष्णवी बी. यांची नागपूरमध्ये नियुक्ती

2019 च्या बॅचच्या IAS अधिकारी वैष्णवी बी यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्रक राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे. राज्य सरकारकडून सोमवारी 5 ऑक्टोबरला या तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com