Maharashtra Hindi exam : फडणवीस सरकारची आणखी एक माघार! 1951 पासून सुरु असलेली परीक्षा तूर्तास स्थगित

Hindi language exam suspended : राज्यात सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा वर्षांतून दोन वेळा आयोजित केली जाते. ही परीक्षा दहावीच्या परीक्षेत हिंदी विषय घेतलेला नव्हता अशा उमेदवारांसाठी घेतली जाते.
Maharashtra Hindi Exam Suspended | Marathi Language Row
Maharashtra government has temporarily suspended the Hindi language examination for gazetted officers and employees following the ongoing Marathi language controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Hindi Exam Suspended : हिंदी विरुद्ध मराठी मुद्द्यावरून महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने आणखी एक माघार घेतली आहे. यापूर्वी पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला होता. तसेच मुंबईतील रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. पण यावरून वाद होताच मराठी भाषा शिकवणार असल्याचे सांगितले होते.

अशातच आता राजपत्रित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी राज्यात १९५१ पासून घेतली जात असलेल्या हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षेला महाराष्ट्र सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्या राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या दहावीच्या शिक्षणात हिंदीचा विषय नव्हता, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी राज्य भाषा संचालनालयातर्फे ही परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा २८ जूनला आयोजित करण्यात आली होती.

राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंदीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेवरूनही काही संघटनांनी वाद निर्माण केला होता, तर दुसरीकडे मराठी अभ्यास केंद्रानेही या परीक्षेवर आक्षेप नोंदविला होता. शासन स्तरावर आता सर्व कामकाजच मराठीतून चालत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडे या परीक्षेसंदर्भात चर्चा सुरू होती; मात्र तूर्तास तिला स्थगिती देण्यात आल्याची माहिती भाषा संचालक अरुण गीते यांनी दिली.

Maharashtra Hindi Exam Suspended | Marathi Language Row
NCP Rajyasabha seat : सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेवर कोण जाणार? 'ही' 5 नावे आघाडीवर, चाकणकरांच्या पदाचाही निर्णय होण्याची शक्यता

परीक्षेवर आक्षेप

या परीक्षेवर मराठी अभ्यास केंद्राने आक्षेप नोंदवत मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा बव्हंशी मराठी भाषिक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच का आहे आणि इतर बिगर हिंदी राज्यांतही अशी हिंदीची सेवांतर्गत परीक्षा घेतली जाते का, असे प्रश्न उपस्थित केले होते. राज्य शासनाने शासन निर्णय काढून प्रस्तावित हिंदी परीक्षा रद्द केल्याचे तत्काळ जाहीर करावे, अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केली होती.

परीक्षा कायमची रद्द करा!

राज्यभरातून या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. मात्र केवळ परीक्षेला स्थगिती नको तर ही परीक्षा कायमची रद्द करावी, या मागणीवर मराठी अभ्यास केंद्र ठाम असल्याचे डॉ. दीपक पवार यांनी म्हटले आहे. जोपर्यंत ही परीक्षा रद्द होत नाही तोपर्यंत या विषयातून माघार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra Hindi Exam Suspended | Marathi Language Row
Sushma Andhare : विधानपरिषदेची संधी हुकल्यानंतर अंधारे पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या; म्हणाल्या, "पक्षप्रमुखांना विश्वास..."

वर्षातून दोनवेळा होते परीक्षा

राज्यात सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्न श्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा वर्षांतून दोन वेळा आयोजित केली जाते. ही परीक्षा दहावीच्या परीक्षेत हिंदी विषय घेतलेला नव्हता अशा उमेदवारांसाठी घेतली जाते. सुरुवातीला ही परीक्षा तदर्थ मंडळामार्फत घेतली जात हेाती. २०२३ पासून ही परीक्षा भाषा संचालनालयामार्फत घेतली जाते. या परीक्षेला सुमारे सव्वादोन हजार उमेदवार बसतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com