NCP Rajyasabha seat : सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेवर कोण जाणार? 'ही' 5 नावे आघाडीवर, चाकणकरांच्या पदाचाही निर्णय होण्याची शक्यता

Sunetra Pawar Rajya Sabha Resignation : बारामती पोटनिवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी (ता.०६) सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या जागेवर राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar Rajya Sabha Resignation : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

पोटनिवडणुकीच्या निकालानंतर बुधवारी (ता.०६) सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या जागेवर राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या सुनेत्रा पवारांनी राजीनामा दिलेल्या जागेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये भुजबळ आणि मलिक यांच्या कुटुंबातील सदस्य, तसंच आनंद परांजपे, अविनाश आदिक, विक्रम काकडे यांची नावे आघाडीवर आहेत.

दरम्यान, राज्यसभेच्या खासदारकीसह राष्ट्रवादीतील अनेक महत्वाची पदे सध्या रिक्त आहेत. यामध्ये सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पदावरून बाजूला केल्यापासून जवळपास 10 महिन्यांपासून हे अध्यक्षपद रिक्त आहे.

Sunetra Pawar
Pune DPC : पुणे 'डीपीसी' निधीवर आमदार-खासदारांचा 'डोळा'; नवनिर्वाचित सदस्यांचा पत्ता कट ?

तसंच भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना महिला आयोग आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या पदावर देखील अद्याप कोणाची वर्णी लावलेली नाही.

विधानसभा निवडणुकीवेळी समीर भुजबळ यांनीही मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते पद देखीर रिकामं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील अशी अनेक महत्त्वाची पदे सध्या रिक्त असून आता या पदांसाठी इच्छूकांनी मोठी गर्दी केली आहे.

Sunetra Pawar
Kolhapur Crime : खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्याने महिला सभापतीच्या नवऱ्याची प्रेयसीला बेदम मारहाण; तब्बल अकरा वर्षांपासून...

त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या खासदारकीसह इतर अन्य पदांवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार नेमकी कोणाला संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com