

Pune News, 07 May : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही नेते इच्छुक होते. यामध्ये ठाकरेसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांचा देखील समावेश होता. मात्र त्या एका जागेसाठी ठाकरेसेनेने अंबादास दानवे यांना संधी दिली.
त्यानंतर सुषमा अंधारेंना डावलल्यामुळे त्या नाराज असल्याचे देखील सांगितलं जात होतं. त्यांची नाराजी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमधून देखील समोर आल्याचं बोललं जात होतं. विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर होताच अशा आमदार, खासदारकी शंभर वेळा कुर्बान म्हणत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो ठेवला होता.
या नंतर सुषमा अंधारेंनी त्यांच्या या नाराजीबाबत माध्यमांमध्ये खुलासा केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, "मी नाराज असण्याचे कारण नाही. मात्र एखाद्या व्यक्तीने एखाद्या पदाची मागणी करण्यात काही गैर नाही. मात्र मिळालं नाही म्हणून नाराज होण्याचं काहीच कारण नाही. एकेकाळी ज्या संभाजीनगरमध्ये आमच्या पक्षाची ताकद होती.
सहा आमदार होते खासदार होता आणि महापालिकेत देखील सत्ता होती. त्या ठिकाणी सध्या पक्षाची अडचणीची अवस्था आहे. त्यामुळे पक्षाला त्या ठिकाणी संजीवनी मिळावी म्हणून दानवे यांना संधी दिली असेल तर हरकत नाही. त्या ठिकाणी जर पक्ष वाढणार असेल तर पक्षप्रमुखांचा निर्णय ,मान्य केला पाहिजे. कारण एका जत्रेने माणूस म्हातारं होत नाही. माझ्यासाठी फार मोठा स्पॅन आहे भविष्यात मला संधी नक्की मिळेल," असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली नाही तरी त्या इतर कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, असा विश्वास पक्षप्रमुखांना असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर हा माझ्यासाठी सन्मान असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
तसंच आमदार नीलम गोर्हे यांच्यासारख्या अत्यंत निरोपयोगी महिलेला पाच वेळा विधान परिषदेचे पद दिले आहे. कारण त्यांना पद दिलं गेलं नसतं तर त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली असती. त्यामुळे कधी कधी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या व्यक्तींना पद द्यावं लागतं आणि त्यातूनच नीलम गोऱ्हे यांना हे पद मिळालं असू शकतं असा टोला देखील सुषमा अंधारे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.