

Maharashtra education news : खाजगी शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे शिक्षक पदभरतीवर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर त्याचा परिणाम होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने अशा संस्थांमधील पदभरतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
व्यवस्थापनातील वादामुळे अनेकदा शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित संस्था पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत सहभागी होत नाही. यापार्श्वभूमीवर सरकारने खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळा चालविणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनातील धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात एक वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असेल तर याप्रकरणी सरकारने पदभरतीसाठी नियमावली तयार केली आहे.
सरकारचा निर्णय
व्यवस्थापनात वाद असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक हे शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापकांच्या मदतीने शिक्षक संवर्गची बिंदू नामावली अद्ययावत करतील. त्यानंतर संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे व समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदाच्या ८० टक्के मर्यादेत पदभरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिध्द करावी लागेल.
पुढील टप्प्यात शाळेतील रिक्त पदांसाठी एकास एक या प्रमाणात (मुलाखतीशिवाय) उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस केली जाईल. या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही. मुख्याध्यापकांकडून नियुक्तीचे आदेश काढले जातील. मुख्याध्यापकांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य न केल्यास त्यांचे वेतन रोखणे व अन्य शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. असे केल्यास संबंधित शाळेवर प्रशासक नेमला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक जिल्ह्यात व एकाच शैक्षणिक विभागात शाळा चालविल्या जात असल्यास पदभरतीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यवाही करतील.
संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक जिल्ह्यात व एकापेक्षा अधिक शैक्षणिक विभागात शाळा चालविल्या जात असल्यास, त्यासंदर्भात कार्यवाही करण्याची जबाबदारी प्रकरण परत्वे शिक्षण संचालकांची असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.