Teachers recruitment : राज्यात 2017 नंतर झालेल्या शिक्षक भरतीचे होणार ऑडिट; हायकोर्टाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने काढला जीआर

teacher recruitment audit maharashtra : अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था, अनुकंपा नियुक्ती, विनाअनुदानित वरून अनुदानितकडे बदली, कनिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ पदावर उन्नयन या मार्गांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्ती होऊ शकते
Teacher Transfer Scam
Teacher Transfer ScamSarkarnama
Published on
Updated on

School teacher jobs maharashtra : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक पदभरती ही जून २०१७ पासून पवित्र पोर्टलद्वारे करणे बंधनकारक आहे. TET तील गुणांच्या आधारे ही प्रक्रिया केली जाते. मात्र, विविध कारणे दाखवून शिक्षण संस्थांच्या स्तरावरच पदभरती करण्यात आल्यास समोर आले आहे. याबाबतीत मुंबई हायकोर्टाने शिक्षक पदभरती अधिक सक्षम करण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाकडून आता ता. २२ जून २०१७ नंतर झालेल्या पदभरतीची संपूर्ण माहिती गोळा केली जाणार आहे.

शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी केला केला. प्रत्येक शैक्षणिक विबागात संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेण्यात येऊन पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या पदभरतीचा अहवाल समितीने शासनास सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्याचप्रमाणे कोर्टाने सरकारला पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीची SOP तयार करण्यास सांगितले आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार, सरकारने समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांना ता. २२ जून २०१७ ते आजतागायत राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदावर पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांचा अहवाल सरकारला उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

Teacher Transfer Scam
Eknath Shinde Shiv Sena : निवडणुका संपताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उलथापालथ; उदय सामंत, राणे, ज्योती वाघमारे, गोगावले, म्हस्केंची टीम सज्ज...

ता. २२ जून २०१७ रोजी व त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक, ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून दिले जाते, अशा शिक्षकांची जिल्हानिहाय व शाळानिहाय माहिती त्या-त्या समित्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून माध्यमिक शिक्षण संचालकांची असेल. त्याचप्रमाणे जून २०१७ नंतर नियुक्ती होऊनही त्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट नाहीत, अशा शिक्षकांची माहिती समितीने संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून उपलब्ध करून घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था, अनुकंपा नियुक्ती, विनाअनुदानित वरून अनुदानितकडे बदली, कनिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ पदावरून पूर्णवेळ पदावर उन्नयन या मार्गांनी पवित्र पोर्टलशिवाय नियुक्ती होऊ शकते, असेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

Teacher Transfer Scam
Shivdeep Lande : तुझ्या एका निर्णयाने मला हादरवून टाकलं..! शिवतारेंचे जावई शिवदीप लांडेंची पत्नीविषयी भावनिक पोस्ट

समित्या स्थापन करणे ते शासनास अहवाल सदार करणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी ता. १५ मे २०१६ पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या दिनांकास किंवा तत्पूर्वी असा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शिक्षण विभागाकडून पदभरतीबाबतची एसओपीही प्रसिध्द केली आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com