Mahayuti Government: महायुती सरकारचा सरकारी कर्मचार्‍यांसाठी सर्वात मोठा निर्णय; आता 'लेट मार्क' लागणार नाही; कारण काय?

Government Employees : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला कायम ठेवला आहे. यातच सरकारनं आता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Mahayuti Government On Government Employees .jpg
Mahayuti Government On Government Employees .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

1. लेटमार्कपासून दिलासा: महायुती सरकारने मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा ड्युटीवर हजर राहण्याची मुभा दिली असून याआधी ही सवलत फक्त 10 मिनिटांची होती.

2. दुर्घटनांचा विचार: लोकलमध्ये होणाऱ्या अपघातांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गर्दी टाळून प्रवास सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

3. फ्यूचर प्लॅनिंग: खासगी क्षेत्रासाठीसुद्धा वेळेच्या नियोजनासाठी टास्क फोर्स स्थापन होणार असून, एकूण कामाचे तास कमी न होता वेळेचे लवचिक नियोजन केले जाणार आहे.

Mumbai News : मंत्रालयापासून ते जिल्हा, तालुका अगदी ग्रामीण भागातील सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना ठरलेल्या वेळेत ड्युटीवर हजर होणे बंधनकारक असते. पण काही कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या कारणांमुळे 'लेटमार्क'च्या कारवाईला सामोरे जावे लागते. आता महायुती सरकारनं (Mahayuti Government) अधिवेशन काळातच मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी कर्मचारी लेटमार्कची कारवाई टाळता येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णयांचा सिलसिला कायम ठेवला आहे. यातच सरकारनं आता सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांना ड्युटीवर अर्धा तास उशिरा हजर राहण्याची मुभा दिली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबतची माहिती दिली आहे. यापूर्वी सरकारी कर्मचार्‍यांना ड्युटीवर हजर राहताना 10 मिनिटांपर्यंत सवलत होती. पण आता सरकारनं ही वेळ 30 मिनिटे अर्थात अर्ध्या तासांपर्यंत वाढवली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सध्यातरी हा निर्णय राज्याची राजधानी असलेल्या मुंबईसाठीच घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामागचा हेतू हा' कार्यालयातील गर्दी कमी करणं आणि मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ठराविक वेळेतील दररोजचा वाढता भार कमी करणं असल्याचंही सरनाईक यांनी सभागृहात सांगितलं.

Mahayuti Government On Government Employees .jpg
Jitendra Awhad: पडळकरांसोबतचा वाद टोकाला; जितेंद्र आव्हाडांचं अधिवेशनातूनच खळबळ उडवणारं ट्विट! म्हणाले,'7218395007 ह्या नंबरवरुन...

मुंबईत दररोज लाखो प्रवासी लोकल रेल्वेनं प्रवास करतात. यात सरकारी, निमसरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गातील प्रवाशांचा समावेश आहे. आपआपल्या नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी अनेकदा प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसून येतात. अशातच मग दुर्घटनाही घडतात. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारनं सरकारी कर्मचार्‍यांना (Government Employees) दिलासा दिला आहे.

कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पावसाळी अधिवेशनात गुरुवारी (ता.17) मुंबईतील वाढत्या लोकल अपघातांचा मुद्दा मांडला.यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारी कर्मचार्‍यांना अर्धा तास ड्युटीवर हजर होण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

Mahayuti Government On Government Employees .jpg
Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये 'सोन्याच्या गावात' प्रचंड राजकीय गोंधळ; सरपंचाविरोतील अविश्वास ठरावावर ग्रामस्थांचं मतदान

यावेळी सरकारच्या वतीनं खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही अशाच प्रकारच्या वेळेच्या नियोजनाचा विचार करण्यासाठी आगामी काळात टास्क फोर्सची स्थापन करण्यात येईल अशी घोषणाही सरनाईक यांनी सभागृहात यावेळी केली.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी जर अर्ध्या तासानं कामाला सुरूवात केली तर,सायंकाळी कामाचे तास वाढतील,एकूण कामाचे तास बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील मंत्र्यांकडून प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही म्हटलं आहे.

Mahayuti Government On Government Employees .jpg
राज्यात आता लवकरच धर्मांतर कायदा? भाजप आमदारांच्या उद्रेकानंतर मुख्यमंत्र्यांचे संकेत

याचदरम्यान, प्रताप सरनाईक यांनी कार्यालयीन वेळेत बदल करणं हा छोटासा बदल वाटत असला तरी, या निर्णयामुळे दररोज लाखो प्रवाशांना दैनंदिन प्रवासादरम्यान दिलासा मिळण्याची शक्यताही सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

  1. प्रश्न: सरकारी कर्मचाऱ्यांना किती वेळेची लेटमार्क सवलत मिळाली आहे?
    उत्तर: आता त्यांना 30 मिनिटांपर्यंत उशिरा येण्याची मुभा मिळाली आहे.

  2. प्रश्न: सध्या हा निर्णय कुठे लागू होणार आहे?
    उत्तर: सध्या फक्त मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच हा निर्णय लागू आहे.

  3. प्रश्न: सरकारने हा निर्णय का घेतला?
    उत्तर: लोकलमधील अपघात आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

  4. प्रश्न: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी काही योजना आहे का?
    उत्तर: होय, वेळेच्या नियोजनासाठी टास्क फोर्स स्थापन केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com