Marathi Language Mandatory : मराठी भाषेवरून चालकांवर टांगती तलवार! तीन महिन्यांत सुधारणा करा, नाहीतर RTO कडून परवाना होणार निलंबित!

Driver Marathi Knowledge News : नव्या नियमानुसार, संबंधित चालकाला मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास परवाना प्राधिकरणाकडून त्याला मराठी भाषा शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे.
Driver Marathi Knowledge News
Driver Marathi Knowledge NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : इलेक्ट्रॉनिक मीटर बसविलेल्या वाहनांच्या परमिटधारकांसह संबंधित वाहनचालकांना आता मराठी भाषेचे कार्यज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून, मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

नव्या नियमानुसार, संबंधित चालकाला मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास परवाना प्राधिकरणाकडून त्याला मराठी भाषा शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. या मुदतीत चालकाने आवश्यक भाषाज्ञान संपादन न केल्यास त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास चालकाच्या वाहनचालक परवान्यावरील बॅज/अधिकृतता तब्बल तीन महिन्यांपर्यंत निलंबित केली जाऊ शकते. निलंबनानंतरही चालकाने नियमांचे पालन केले नाही, तर त्याची बॅज/अधिकृतता रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Driver Marathi Knowledge News
Nashik Government Offices: नाशिकच्या शासकीय कार्यालयांचा होणार कायापालट : 22 कोटींची तरतूद ; जिल्हाधिकारी आयुष प्रसादांची माहिती

परमिट नूतनीकरणासाठीही मराठीचे ज्ञान आवश्यक

केवळ चालकांपुरता हा नियम मर्यादित नसून, वाहनाच्या परमिट नूतनीकरणाच्या वेळी परमिटधारकाला मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान असल्याचे प्राधिकरणाच्या समाधानाप्रमाणे सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे परमिट नूतनीकरण करताना मराठी भाषेचे ज्ञान हा महत्त्वाचा निकष ठरणार आहे.

Driver Marathi Knowledge News
Nashik Government Offices: नाशिकच्या शासकीय कार्यालयांचा होणार कायापालट : 22 कोटींची तरतूद ; जिल्हाधिकारी आयुष प्रसादांची माहिती

RTO मध्ये होणार भाषेची परीक्षा

संबंधित परमिटधारकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची चाचणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांमार्फत घेण्यात येणार आहे. ही चाचणी उत्तीर्ण होणे संबंधित परमिटधारकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील असाधारण भाग चार-अमध्ये 12 ऑगस्ट 2026 रोजी या सुधारणांची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील संबंधित परमिटधारक आणि वाहनचालकांनी नव्या नियमांची नोंद घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com