New Delhi News : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा यंदाच्या निवडणूक प्रचारात भाजप उचलून धरण्याची शक्यता असून, त्याचा फायदा मतपेटीत करून घेण्याच्या जोरदार प्रयत्नात आहे. याचवेळी एनसीईआरटीने मोठा निर्णय घेतला आहे.
'एनसीईआरटी'ने गुरुवारी (ता. 4)आपल्या वेबसाइटवर हे बदल केले आहेत. यात बारावी राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील अयोध्येतील (Ayodhya) रामजन्मभूमी, बाबरी मशीद वादावरील मजकूर बदलण्यात आला आहे. राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील भारताचे राजकारण-नवा अध्याय' या धड्यामधला बाबरी मशीद आणि 'हिंदुत्वाचे राजकारण' यासंबंधीचे संदर्भही वगळण्यात आले आहेत. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याचा संदर्भ तीन ठिकाणांहून काढून टाकण्यात आला आहे.
या पाठ्यपुस्तकात आता रामजन्मभूमी आंदोलन आणि 2019 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भर देण्यात आला आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिराची (Ram Mandir) निर्मिती कशाप्रकारे करण्यात आली, याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासंबंधीचे वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स'ने दिले आहे. आता महिनाभरात नवे पुस्तक बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
NCERT ने पाठ्यपुस्तकातील बदल करण्यापाठीमागची भूमिकादेखील स्पष्ट केली आहे. यात त्यांनी अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करण्यात आले असल्याचे नमूद केले आहेत. त्यात पुस्तकातून गुजरात दंगलीसंदर्भातील परिच्छेद वगळतानाच गुजरात दंगल प्रकरणातील पीडितांच्या धर्माचा उल्लेखही टाळला आहे. या आधी पुस्तकात 'मुस्लिमविरोधी गुजरात दंगल' असा उल्लेख होता.
'सीबीएससीईशी निगडित शाळांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके वापरली जातात. देशभरात 'सीबीएससीई बोर्डाशी संलग्न शाळांची संख्या जवळपास 30 हजारांहून अधिक आहे. इतर राज्यांच्या पुस्तकांमध्येही आगामी काळात हा बदल होण्याची शक्यता आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.