Nitin Karir News : मुख्य सचिव नितीन करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ ; निवडणूक आयोगाचा निर्णय!

Chief Secretary of Maharashtra : राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेली तिन्ही नावे निवडणूक आयोगाने फेटाळली
Nitin Karir
Nitin KarirSarakarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव पदावर असणाऱ्या नितीन करीर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय निवडणूक आयोगाने स्वत:हून म्हणजेच राज्य सरकारने कुठलाही प्रस्ताव दिलेला नसताना घेतला आहे.

नितीन करीर हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार होते. मात्र आता त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याने त्यांचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत झाला आहे. नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिव पदावर 31 जानेवारी 2023 रोजी निवड जाहीर झाली होती आणि 1 जानेवारीपासून त्यांनी कामकाज सुरू केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Karir
Nitin Karir : महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव नितीन करीर, आहेत तरी कोण?

कारण, तत्कालीन मुख्य सचिव मनोज सौनिक हे 31 डिसेंबर 2023 रोजी निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती केली गेली होती. 2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान करीर यांच्यावर महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

मुख्य सचिवांच्या नावाचा प्रस्ताव नसताना त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याची ही राज्याच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून केवळ सुजाता सौनिक यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला गेला होता, मात्र निवडणूक आयोगाकडून तो फेटाळला गेला होता. त्यानंतर आयोगाने तीन नावे सुचवण्याचे आदेश दिले होते.

Nitin Karir
Maharashtra Chief Secretary : राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव मिळणार? तीन नावांची शिफारस...

त्यानुसार राज्य सरकारने सुजाता सौनिक - मुख्य सचिव (गृह) , इकबालसिंह चहल - अतिरिक्त मुख्य सचिव(सीएमओ) आणि राजेश कुमार मीना - अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) या तीन नावांचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव देखील नाकारला आणि अखेर मुख्य सचिव नितीन करीर यांनाच मुदतवाढ जाहीर केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com