IPS Suicide Note Viral : "ती बळजबरीने खोलीत यायची अन्..." : ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, महिला सहकाऱ्यावर गंभीर आरोप, पोलीस दलात खळबळ!

IPS officer suicide case latest update : ट्रेनी IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर समोर आलेली सुसाईड नोट व्हायरल झाली असून त्यातील गंभीर आरोपांमुळे प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
IPS Officer Uday Krishna Reddy
IPS Officer Uday Krishna Reddy Sarkarnama
Published on
Updated on

IPS trainee officer suicide note viral : हैदराबादमध्ये प्रशिक्षण सुरु असलेल्या आयपीएस अधिकारी उदय कृष्णा रेड्डी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, ही आत्महत्येची घटना होती की अन्य कोणत्या कारणामुळे त्यांची तब्येत बिघडली, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

रविवारी संध्याकाळी रेड्डी हे एका मित्राच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षण सुरु असलेल्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली होती.

IPS Officer Uday Krishna Reddy
Farmer Loan Waiver Scheme 2026 : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! काय आहे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026'? कोणाला आणि कसा मिळणार लाभ?

महिला अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत रेड्डी यांच्यावर पाठलाग करणे, धमक्या देणे, मारहाण करणे, परवानगीशिवाय खासगी व्हिडीओ तयार करणे तसेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत. याशिवाय, व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश पाठवणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे आणि मोबाईलमधील वैयक्तिक चॅट तपासल्याचाही दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी लिहिल्याचे सांगितल्या जाणाऱ्या दोन पानी सुसाईड नोटमध्ये त्यांनी वेगळी बाजू मांडली आहे. त्यांच्या मते, संबंधित महिला अधिकारी आणि त्यांच्यात जून 2025 पासून परस्पर संमतीने प्रेमसंबंध होते.

सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे, "मी उदय कृष्ण रेड्डी आणि (महिला) जून 2025 पासून रिलेशनशिपमध्ये होतो. तिच्या लग्नानंतरही आमच्यात शारीरिक आणि भावनिक संबंध कायम होते. ती स्वतः माझ्या खोलीत यायची. अनेक वेळा तिने चॅट करून मला खोली उघडण्यास सांगितले होते. त्याचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत."

IPS Officer Uday Krishna Reddy
Devendra Fadnavis : CM फडणवीसांच्या एका निर्णयाने नाशिकच्या राजकीय वातावरणाची हवा टाईट ; लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय वर्तुळाचे लागणार 'लाईट'

तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे, "9 जुलै 2016 रोजी ती स्वतः माझ्या खोलीत आली आणि शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकला. तिने माझी संमती न घेता मला किस केले आणि मिठी मारली. त्यामुळे मी पुरावा म्हणून ते रेकॉर्ड केले आणि तिच्या पतीला पाठवले."

रेड्डी यांनी तक्रार मित्रांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे, महिलेच्या तक्रारीनंतर हैदराबाद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन्ही बाजूंचे दावे आणि उपलब्ध पुरावे तपासून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या रेड्डी यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com