पुण्यात MPSC चा अभ्यास करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाची नैराश्यातून आत्महत्या...

Pune : त्रिभुवन हा नेहमीप्रमाणे अभ्यासिकेमध्ये गेला नाही...
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परिक्षेचा पुण्यात अभ्यास करणाऱ्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. ही घटना गांजवे चौक परिसरात घडली असून मंगळवारी (ता.२० सप्टेंबर) दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या तरूणाने नैराश्‍येतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. (Pune, MPSC, Crime News)

Pune Crime News
धक्कादायक : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या

त्रिभुवन विठ्ठल कावले (वय 30, रा. गांजवे चौक, मुळ रा. जालना) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिभुवन कावले हा तरुण मुळचा जालना येथील रहिवासी असून तो मागील दिड वर्षांपासून पुण्यातील गांजवे चौक परिसरात वास्तव्यास होता. याच परिसरातील एका अभ्यासिकेमध्ये तो "एमपीएससी'चा अभ्यास करीत होता.

दरम्यान, मंगळवारी त्रिभुवन हा नेहमीप्रमाणे अभ्यासिकेमध्ये गेला नाही. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याचे मित्र तो राहात असलेल्या ठिकाणी गेले, त्यावेळी त्याची खोली आतुन बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वारंवार आवाज देऊनही त्रिभुवनने खोली उघडली नसल्याने त्यांच्या मित्रांनी खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्रिभुवनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांनी यानंतर तत्काळ विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली.

Pune Crime News
मुख्यमंत्र्यांसमोर '५० खोके एकदम ओके'च्या घोषणांचा इशारा; NCP कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी मृत्युपुर्वी लिहीलेली चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये आपण नैराश्‍येतुन आत्महत्या केल्याचे त्याने नमूद केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com