NCP Political News : अजितदादांसोबत गेलेल्या एका नेत्याने दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट ; उद्योगनगरीत राष्ट्रवादीत 'घरवापसी' ?

Sharad Pawar Vs Ajit Pawar : कारण शहरातील अजित पवारांबरोबर गेलेल्या चिंचवडमधील एका बड्या नेत्याने गुरुवारी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri Chinchwad : राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर शरद पवार गटाने पिंपरी-चिंचवडची जबाबदारी युवा आमदार रोहित पवारांवर सोपवली आहे. १८ तारखेला शहराचा झंझावाती दौरा केल्यानंतर सहा दिवसांतच ते पुन्हा शनिवारी येत आहेत. निमित्त गणेशोत्सव आणि गणेश मंडळांना भेटीचे असले, तरी त्यातून ते नव्याने पक्षबांधणीची दिलेली जबाबदारीच पार पाडणार आहेत.

दरम्यान,पक्षफुटीचे चित्र काहीसे स्पष्ट झाल्यानंतर द्विधा मनस्थितीत गेलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आता ठोस भूमिका घेऊ लागले आहेत. त्यातून १८ तारखेला शहराच्या माजी उपमहापौरांसह माजी शहर सरचिटणीसांची घरवापसी झाली. त्यावेळीच आणखी काही माजी नगरसेवक संपर्कात असून लवकरच त्यांची घरवापसी होईल,असे रोहित म्हणाले होते. ते बहुधा पितृपक्ष संपल्यावर खरे होईल,असे संकेत काल मिळाले.

Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar VS Ajit Pawar: अजितदादांची नवी चाल; शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची केली मागणी

कारण शहरातील अजित पवारां(Ajit Pawar) बरोबर गेलेल्या चिंचवडमधील एका बड्या नेत्याने काल दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. ते पुढील महिन्यात शहरात जाहीर सभा घेणार असून त्यावेळी या नेत्याची घरवापसी होईल असा अंदाज आहे. तर, त्या अगोदर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शहर कार्यालयाच्या उदघाटनासाठी येणार असून त्यावेळीही काहींची घरवापसी होणार असल्याचे सांगण्यात आले.

आमदार रोहित पवार यांच्याप्रमाणे उद्योगनगरीचे शरद पवार(Sharad Pawar) राष्ट्रवादीचे नवनियुक्त अध्यक्ष तुषार कामठे हे ही कामाला लागले आहेत. १६ तारखेला नेमणूक होताच त्यांनी सात दिवसांतच गुरुवारी दिल्ली गाठली. संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवारांची त्यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर शहराचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे त्यांच्याबरोबर होते. यावेळी कोल्हेंनी कामठेंचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी पक्षबांधणीवर चर्चा केली.

गणेशोत्सवानिमित्त कालच आमदार रोहित पवार(Rohit Pawar) हे पिंपरी-चिंचवडमध्ये येणार होते. पण, काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचा हा दौरा ऐनवेळी रद्द झाला. तो आता उद्या होत आहे. दुपारपासून ते पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभेतील गणेश मंडळाना भेटी देणार आहेत.

यावेळी ते गणेश मंडळासोबतच काही माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत,अशी माहिती पक्षाचे शहर प्रवक्ते माधव पाटील यांनी दिली. लोकांच्या समस्या सांगून त्या सोडवण्याची आम्हाला शक्ती-युक्ती आणि आशीर्वाद दे, हे गणरायाला साकडे घालण्यासाठी रोहितदादा येणार असल्याचे कामठे यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar and Ajit Pawar
Beed NCP Politics : बीडमध्ये राष्ट्रवादीच्या बांधणीपेक्षा 'गटबाजी'च मजबूत; क्षीरसागर पुतण्यांचं वर्चस्व मोडीत..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.