Pune ACB Action : वैधमापनशास्त्र विभागातील अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

ACB Action News : येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ACB action against Bribe
ACB action against BribeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : येरवडा येथील वैधमापनशास्त्र विभागाच्या कार्यालयात डॉ. ललित बेनीराम हारोळे (वय ५५) यांना ३१ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 'एसीबी'ने अटक केली. या संदर्भात वैधमापनशास्त्र विभागातील इस्लामपूर येथील निरीक्षक यांनी तक्रार दिली होती. त्यावरून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभागातील निरीक्षकाकडून ३१ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली. 'एसीबी'चे पोलीस (Police) उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हारोळे हा येरवडा येथील वैधमापनशास्त्र वैधमापनशास्त्र विभागाचा प्रमुख आहे. हारोळे याने त्याच्या कार्यक्षेत्रात पडताळणी आणि मुद्रांकनासाठी प्रत्येक निरीक्षकाकडे दरमहा चार हजार रुपये हप्ता देण्याचे आदेश दिले होते.

ACB action against Bribe
Nilesh Lanke News : आमदार लंके संतापले; मुख्यमंत्री शिंदेंनी भेट देऊनही अतिवृष्टीग्रस्तांना मदत नाहीच

त्यानुसार इस्लामपूर, कराडमधील दोन, सातारा अशा चार निरीक्षकांकडून प्रत्येकी चार हजार रुपये तसेच डायमंड शुगर वर्क कंपनीच्या कामासाठी १५ हजार रुपये अशी एकूण ३१ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत इस्लामपूर येथील निरीक्षकाने एसीबीच्या पुणे (Pune) कार्यालयात तक्रार दिली होती.

ACB action against Bribe
Muralidhar Mohol News : मोहोळांकडे आता 'महाविजय २०२४' चे लोकसभा समन्वयकपद अन् 'हर घर तिरंगा'ची जबाबदारी

त्याची पडताळणी करून 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातच हारोळे याला लाच घेताना अटक केली. 'एसीबी'चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.