गद्दारी केलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणारच!

Bhai Jagtap : विधान परिषदेत आमदारकीची शपथ घेण्यासाठी कॉंग्रेसचे (Congress) दोन आमदार असते तर मला अधिक आनंद झाला असता.
 Bhai Jagtap
Bhai Jagtap sarkarnama
Published on
Updated on

पुणे : विधान परिषदेत (Maharashtra Legislative Council Election) आमदारकीची शपथ घेण्यासाठी कॉंग्रेसचे दोन आमदार असते तर मला अधिक आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आज व्यक्त केली. फुटलेल्या मतांची चौकशी करून संबंधित आमदारांवर कारवाई होणार असल्याचा विश्‍वासदेखील आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

 Bhai Jagtap
राज्य सरकारला दणका; OBC आरक्षणाशिवाय ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर

विधान परिषदेवर निवडून आलेल्या १० आमदारांना आज पदाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार जगताप यांनी या चौकशी आणि कारवाईची आठवण करून दिली. आभदार जगताप म्हणाले, ‘‘ विधान परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यामुळे चौकशीची प्रक्रिया काहीशी बाजूला पडली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी झाल्या प्रकाराची योग्य दखल घेतली आहे. त्यामुळे चौकशी करून संबंधित आमदारांवर कारवाई नक्की होईल.’’

 Bhai Jagtap
श्रीकांत शिंदेंनी शर्थीची खिंड लढवत शिवसेनेचा बालेकिल्ला उभा केला वडिलांच्या पाठिशी!

या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीक्रमासाठी २९ मतांचा कोटा दिला होता. त्यानुसार सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, हंडोरे यांना प्रत्यक्षात २२ मते मिळाली. त्यामुळे पक्षात नाराजीचा सूर असून ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही त्यांची चौकशी करून कारवाई निश्‍चितपणे होईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

कॉंग्रेस श्रेष्ठींपासून राज्यातील सर्व नेत्यांनी चौकशीचा आग्रह केला आहे. त्यावर लवकरच कार्यवाही होईल. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय नेत्यांना तशी विनंतीदेखील केली आहे, असे आमदार जगताप यांनी सांगितले. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, मात्र, काळ सोकावता कामा नये, अशी याबाबत पक्षातील साऱ्यांची भूमिका असल्याचे आमदार जगतात यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com