Supriya Sule Aggressive : पुण्यातील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक; ‘हल्ले करा; गोळ्या घाल्या; पण आम्ही झुकणार नाही’

NCP News : सुसंस्कृत म्हणवल्या गेलेल्या महाराष्ट्रात आज सर्वत्र गुंडाराज बोकाळला आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : पुण्यात डॉ. विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे आणि ॲड असिम सरोदे यांच्यावरील हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातूनच त्यांनी महायुती सरकारला चॅलेंज दिले आहे. माझ्यावर गोळी चालवली तरी ही सुप्रिया सुळे कोणत्याही दडपशाहीसमोर झुकणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या किंवा हल्ले करून आमचा जीव घेतला तरी आम्ही घाबरणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले. (After the attack in Pune, Supriya Sule is aggressive)

पुण्यात सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे, त्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करते. देशात सर्वत्र दडपशाही सुरू आहे. लोकशाही कुठेही दिसत नाही. सुसंस्कृत म्हणवल्या गेलेल्या महाराष्ट्रात आज सर्वत्र गुंडाराज बोकाळला आहे. या झुंडशाहीच्या विरोधात आम्ही प्राण पणाला लावून लढणार आहोत, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule
Sunetra Pawar Banner : बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाई फेकली...सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया...

बारामती मतदारसंघातील लढतीबाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. बारामतीत माझ्याविरोधात कोणीही निवडणूक लढवली तरी माझी काही एक हरकत नाही. लोकशाहीत विरोधक असायलाच हवा. पण तो दिलदार असावा, एवढी अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाणी, बेरोजगारी आणि शेतीमालाला न मिळणार हमीभाव ही तीन आव्हाने बारामती मतदारसंघात आहेत. देशाच्या ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती घटत चालली आहे. ती वाढविणे गरजेचे आहे. पण जोपर्यंत शेतीपिकांना हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत ग्रामीण भागतील लोकांची क्रयशक्ती वाढणार नाही, असा दावा सुळे यांनी केला.

आमच्या पुढे मार्गच राहिला नाही

केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. शेतकऱ्यांनी पिकविण्याचे बंद केले तर या देशाचे काय होईल, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. उपोषणे, आंदोलने करूनही सरकार ऐकत नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी आमच्यापुढे मार्गच शिल्लक राहिला नाही.

Supriya Sule
Dhananjay munde : "नेतृत्वासाठी अजित पवार झिजले, अनेकांना विजयी टिळा लावला, पण...", धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

जरांगे पाटील यांची फसवणूक

सरकारने आंध्र प्रदेश, ओरिसा येथील आरक्षणाचे प्रश्न विधेयकाद्वारे लोकसभेत मांडले. पण, राज्यातील धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला जात नाही. त्यावर केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने आरक्षणाचा प्रश्न पाठविला नसल्याचे उत्तर देण्यात आले. महाराष्ट्र सरकारची यावर काय भूमिका आहे, असा सवाल सुळे यांनी केला. मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करावे लागत आहे; म्हणजे सरकारने त्यांची फसवणूक केली आहे, हे सिद्ध होते.

Supriya Sule
Nirbhay Bano Solapur Sabha : सोलापुरात कडेकोट बंदोबस्तात ‘निर्भय बनो’ची सभा सुरू; चौधरी, सरोदे यांची उपस्थिती

महाराष्ट्रावर कसला राग?

महाराष्ट्रावर केंद्र सरकारचा कसला राग आहे, कुणास ठावूक. आपल्याकडी गुंतवणूक दुसऱ्या राज्यात वळविली जाते. इतर राज्यातील आरक्षणाचे प्रश्न सुटतात. मात्र, महाराष्ट्राचे प्रश्न सोडविले जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

Supriya Sule
Sambhaji Raje's Big Statement : संभाजीराजेचं सूचक अन्‌ मोठे विधान, ‘आता माझं महाराष्ट्रापेक्षा देशावर लक्ष’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com