Congress News: मल्लिकार्जुन खर्गेंची खुर्ची धोक्यात: संकटात सापडलेल्या मित्रपक्षानं टाकला डाव, सोनिया गांधींनाच दिला नवा प्रस्ताव

TMC News: लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी आणि काँग्रेसशी काहीशा फटकून वागणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीलाच हजेरी लावली.त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
Sonia Gandhi Mamata Banerjee
Sonia Gandhi Mamata Banerjee Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत 15 वर्षांची सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जींना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. एकीकडे सत्तेतून पायउतार होण्याची नामुष्की ओढावल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं चित्र आहे.

याचदरम्यान, काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी बॅनर्जी यांना त्यांचा टीएमसी पक्ष काँग्रेसपक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव देत मोठी ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेससमोर मोठा प्रस्ताव ठेवल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेससमोर ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवत त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.यामुळे आमदार - खासदारांच्या बंडखोरीमुळे संकटात सापडलेल्या टीएमसी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अभिषेक बॅनर्जी यांनी हा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवत एकप्रकारे मोठा डाव टाकल्याचंच बोललं जात आहे. तर दुसरीकडे सध्या राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आहे. जर काँग्रेसनं हा प्रस्ताव मान्य केला, तर खर्गे यांची विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची धोक्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर टीएमसीच्या 58 आमदारांनी केलेल्या बंडाचं निशाण फडकवलं होतं. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासाठी दुसरा मोठा धक्का लोकसभेतील 20 खासदारांनीही स्वतंत्र गट निर्माण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेत दिला होता.

Sonia Gandhi Mamata Banerjee
Bomb Threat: मुंबई, पुण्याच्या महापौरांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल; महापालिकेची इमारत केली रिकामी; नागपूरमधील ठिकाणंही टार्गेटवर

या दोन मोठ्या धक्क्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या हातून पक्ष निसटल्यातच जमा झाल्याची चर्चा आहे. टीएमसी पक्षाची मोठी वाताहत सुरू असल्याचं लपून राहिलेलं नाही. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीनंतर इंडिया आघाडी आणि काँग्रेसशी काहीशा फटकून वागणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीलाच हजेरी लावली.त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

एवढंच नव्हे तर, विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची गळाभेटही घेतली होती. ही गळाभेट म्हणजे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस आणि टीएमसी पक्षात निर्माण झालेला दुरावा संपल्याचेच संकेत होते.

Sonia Gandhi Mamata Banerjee
Sameer Bhujbal: मंत्रिपद नाकारलं, काकांना राज्यसभेला डावललं... तरीही समीर भुजबळांकडून भाजपचं भरभरून कौतुक

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं विमान हवेतलं विमान आता जमिनीवर आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमेकांच्या जवळ आलेल्या काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी आता ममता बॅनर्जी यांना मोठी ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी यांनी बॅनर्जी यांना त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करण्यासंदर्भातला प्रस्ताव दिल्याचा सूत्रांची माहिती आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात स्थापनेनंतरची सर्वात मोठी फूट पडल्याचं चित्र आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगाल आणि दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com