
Pune News : धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काही दिवसांपासून प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप (Sangram jagtap) यांच्याकडून विशिष्ट धर्माबाबत चितावणीखोर वक्तव्य केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे कुठेतरी पक्षाची धर्मनिरपेक्ष प्रतिमा डॅमेज होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितीपासून बहुसंख्य असा मुस्लिम समाज पक्षाच्या सोबत राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर देखील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक नेते अजित पवारांसोबतच राहिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक ठिकाणी महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावरती निवडणूक लढतील असे चित्र आहे.
अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा पूर्वीपासून सोबत राहिलेला हा मतदार काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षापासून दूर जाईल का? अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. तसं झाल्यास पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून संग्राम जगताप हे एका विशिष्ट धर्माबाबत वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच दिवाळीच्या निमित्ताने संग्राम जगताप यांनी फक्त हिंदू धर्मियांच्या दुकानांमधूनच दिवाळीची खरेदी करा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रभरात या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी देखील संग्राम जगताप यांना नोटीस पाठवून याबाबत जाब विचारला तसंच त्यांची कानउघडणीही केली असल्याचे सांगितलं जातं आहे. असं असलं तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संग्राम जगतापांच्या विधानाचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल मोड ऑन करण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.
एकीकडे संग्राम जगताप यांना समज देऊन चितावणीखोर विधान बंद करण्यास सांगितला असतानाच दुसरीकडे पुण्यातील शनिवार वाडा परिसरामध्ये नमाज पठणावरून सुरू असलेल्या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप विरोधात खिंड लढवण्यास सुरुवात केली आहे. अशा पद्धतीने नमाज पठण झालं असेल तरी त्यामध्ये कोणती गैर गोष्ट नसल्याचं भूमिका राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी घेतली आहे. एकप्रकारे विशिष्ट समाजाचे बाजू राष्ट्रवादीकडून लावून धरली जात असल्याचे बोलले जात आहे.
शनिवारवाडा नमाज पठण वादामध्ये ही भूमिका लावून धरत जो काही डॅमेज संग्राम जगताप यांच्या वक्तव्यामुळे झालं आहे. तो भरून काढण्याचा प्रयत्न रूपाली पाटील ठोंबरे यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.
नमाज पठणाचा व्हिडिओ शेअर करत भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात रूपाली पाटील ठोंबरे या उतरल्या असून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.
रूपाली ठोंबरे पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कौतुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला हक्काचा असलेला मतदार दुरावू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेला हा डॅमेज कंट्रोलचा प्लॅन कितपत सक्सेसफुल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.